खा. शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याचा लोणंद येथे निषेध


दैनिक स्थैर्य । दि.१० एप्रिल २०२२ । लोणंद । लोणंद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने माजी केद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या मुंबई येथील सिल्व्हर ओक या निवासस्थानावरती एसटीच्या विलीनीकरणासाठी एसटी कर्मचाऱ्याकडुन झालेल्या भ्याड हल्ल्याचा नगरपंचायत समोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी एकत्र येऊन जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

यावेळी जिल्हा कोवीड समन्वय समितीचे सदस्य डॉ नितीन सावंत, दयानंद खरात, विनोद क्षीरसागर, उपनगराध्यक्ष शिवाजीराव शेळके – पाटील, एन. डी. क्षीरसागर, शंकरराव क्षीरसागर, सुभाष घाडगे, लक्ष्मण शेळके, सागर शेळके, रविद्र क्षीरसागर, गणीभाई कच्छी, भरत बोडरे, सागर गालिंदे, वैभव खरात, सुनिल शेळके, आजमभाई आत्तार, भिकुदादा कुर्णे, बबन शेळके, हारिषचंद्र डोईफोडे, दादासाहेब शेळके आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!