प. बंगालमधील भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निवेदनाद्वारे निषेध

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. ०६: पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्ष कार्यकर्ते, त्यांच्या संपर्क कार्यालयावर, सार्वजनिक मालमत्तेवर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ फलटण तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने तहसीलदार फलटण समीर यादव यांना निवेदन देवून हल्लेखोरावर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर व लोकप्रतिनिधींच्या सूचनेनुसार आज फलटण तालुका भाजपच्यावतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले त्यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, तालुकाध्यक्ष पै. बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, अल्पसंख्याक मोर्चाचे राज्य सरचिटणीस अनुप शहा, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नानासाहेब इवरे उपस्थित होते.

निवेदनावर नगर परिषदेतील विरोधी पक्षाचे गटनेते अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष रियाज इनामदार, ओबीसी मोर्चाचे जिल्हा सचिव रामभाऊ शेंडे, भटक्या विमुक्त जमाती सेलचे अध्यक्ष सुनील जाधव, संघटक सरचिटणीस सुधीर जगदाळे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष रणजीत जाधव, युवा नेते गोरख जाधव, धर्मराज देशपांडे, महेश हिंगसे वगैरेंच्या सह्या आहेत.

पश्चिम बंगालमध्ये लोकशाही पद्धतीने लढणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहोत, तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे हल्ले केले त्याचा आम्ही जाहीर निषेध करीत आहे. त्या कुटुंबाच्या सोबत आम्ही आहोत, तृणमूल काँग्रेस पक्षामुळे पश्चिम बंगालमध्ये लोकशाही जिवंत नाही तर हुकूमशाहीने जन्म घेतला आहे सत्तेचा उन्माद या ठिकाणी दिसत असल्याचे नमूद करीत जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे व सहकाऱ्यांनी या घटनेचा निषेध केला.


Back to top button
Don`t copy text!