स्थैर्य, म्हसवड दि. २६ : माण देशी महिला सहकारी बॅकेने करोनाच्या महामारीत ग्राहकांची सेवा करणाऱ्या बॅकेच्या अधिकारी, कर्मचारी, स्टाफ, अल्प बचत प्रतिनिधी व वित्तीय सल्लगार यांना विमा संरक्षण देवून अनोखा सन्मान केला असुन आपल्या योध्द्यांना संरक्षण कवच देणारी माणदेशी बँक ही जिल्ह्यातील पहिली बँक ठरली आहे.
आज देशात करोना महामारीच्या काळात फक्त अत्यावश्यक सेवाच सुरु आहेत व बॅक हि अत्यावश्यक सेवे मध्ये येत असल्याने बॅकेचे अधिकारी, कर्मचारी, स्टाफ, अल्प बचत प्रतिनिधी व वित्तीय सल्लगार हा आपला जीव धोक्यात घालून ग्राहकांना सेवा देत आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्याच मूल्यमापन करता येणार नाही शिवाय सगळ्यात महत्वाचे म्हणजे माणदेशी हि ग्रामीण महिला बॅक असून ग्रामीण कष्टकरी महिलांच्या साठी कार्यरत असल्याने कोठेही न अडता आपण महिला स्टाफ असूनसुद्धा त्यांना सेवा देत आहात हि कौतुकास्पद बाब आहे. याबाबतची माहिती बॅकेच्या संस्थापिका श्रीमती चेतना सिन्हा यांनी दिली.
एवढच काय महिला बॅकेच्या स्टाफने कोरोना महामारीच्या काळात जेष्ठ नागरिकांना त्यांचे घरी जावून बॅक भरणा अथवा विड्रोल यासारख्या सर्व सेवा दिल्या हे फक्त माणदेशी महिला बॅकच करू शकते. याकरिता सर्व स्टाफला प्रोत्साहन मिळावे व आणखी तत्परतेने ग्राहकांना सेवा द्यावी या उद्देशाने अधिकारी, कर्मचारी, स्टाफ, अल्प बचत प्रतिनिधी व वित्तीय सल्लगार यांना विमा संरक्षण देण्याबाबतचा महत्वपूर्ण निर्णय माणदेशी महिला बॅकेच्या वतीने घेण्यात आला.
कोणत्याही बॅकेचा कारभार हा अधिकारी, कर्मचारी व स्टाफच्या माध्यमातून चालविला जात असतो कारण प्रत्यक्ष संबध बॅकेच्या ग्राहकांशी येत असल्याने संक्रमण होण्याची जास्त शक्यता असते. या अधिकाऱ्यांच्या व स्टाफच्या कुटुंबाचा विचार करता त्यांना विमा संरक्षण गरजेचे असल्याने हा महत्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाचा बैठकीत सर्वानुमते घेण्यात आल्याचे महिला बॅकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. रेखाताई कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रत्येकजण आपली जबाबदारी हि स्वतःचे रक्षण करीत प्रामाणिकपणे निभावत आहे तरीही वर्तमान पत्रातून कित्येक बॅक कर्मचारी संक्रमित झाल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. असे असताना माण देशी महिला सहकारी बॅकेने त्यांच्या ग्राहकांना सेवा देणाऱ्या सर्व स्टाफना प्रत्येकी दहा लाख रुपयाचे विमा संरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असून त्यासोबतच पिग्मी एजंट व वित्तीय सल्लागार यांना पाच लाख रुपयाचे विमा सौरक्षण देण्याचा अभूतपूर्व निर्णयही घेतला आहे.
या महत्वपूर्ण निर्णयाने बॅक कर्मचाऱ्यामध्ये उस्ताह व सबलता येणार असून अशाप्रकारे बॅक अधिकारी, स्टाफ, अल्प बचत प्रतिनिधी व वित्तीय सल्लागार याना कोव्हिड-19 मध्ये जास्तीचा विमा संरक्षण देणारी पहिलीच महिला बॅक आहे कि जी आपल्या अधिकारी, स्टाफ, पिग्मी एजंट व वित्तीय सल्लागार यांना परिवारातील सदस्य मानत असल्याचे माणदेशी महिला बॅकेचे प्रमुख प्रवर्तक सल्लागार संजीव खान यांनी मत व्यक्त केले.