कर्करोग टाळण्यासाठी शालेय मुलींना मिळणार लस

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । 1 एप्रिल 2025। सातारा । जिल्हा परिषदेने मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून सुरक्षित करण्यासाठी ’मिशन तेजस्विनी’ उपक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत दोन हजार 800 शालेय मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण मिळाले आहे. या माध्यमातून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी शालेय मुलींना लस दिली जात आहे.

दरम्यान, गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील लसीकरणासाठी जिल्हा परिषदेने माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) यांचे सामाजिक दायित्व उपक्रमातील (सीएसआर) भागीदार असलेल्या जीविका फाउंडेशनसोबत सामंजस्य करार केला आहे.

या माध्यमातून गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळण्यासाठी शालेय मुलींना लस दिली जात आहे. मागील काही वर्षांत कर्करोगाचे हजारपेक्षा जास्त प्रमाण वाढले आहे. अल्प वयात शालेय मुलींना गर्भाशयच्या मुखाचा कर्करोग होत असल्याचे निदर्शनास येत आहे. याला आळा घालण्यासाठी लसीकरण मोहिमेची पूर्वतयारी म्हणून 50 हून अधिक शाळांमध्ये अभियान राबवले गेले. यामध्ये एक हजारहून अधिक शिक्षक, पाच व्यापक विद्यार्थी आणि तितक्याच संख्येनेपालक यांना गर्भाशयाचे आरोग्य, लवकर तपासणी आणि प्रतिबंध याविषयी माहिती देण्यात आली आहे.

याबाबत जीविका फाउंडेशनचे संचालक जिग्नेश पटेल म्हणाले, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा ही काळाची गरज आहे आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हा वेळेवर लस घेतल्यास टाळता येऊ शकणारा आजार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही केवळ संरक्षणच देत नाही, तर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यात जनजागृतीही करत आहोत.

लसीकरण मोहिमेदरम्यान लसीकरण केंद्रांवर सुरक्षिततेला प्राधान्य देत संपूर्ण काटेकोर व्यवस्थापन केले. माजगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडचे अमित नबीरा म्हणाले, एमडीएल केवळ भारताच्या सागरी क्षेत्राची ताकद वाढवत नाही, तर समाजावरही सकारात्मक प्रभाव निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहे. या उपक्रमाद्वारे आम्ही तरुण मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्याचा आणि आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत.

मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन म्हणाल्या, मिशन तेजस्विनी हा महिलांच्या आरोग्यासाठी आणि कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे. कर्करोगमुक्त सातारा घडवण्यासाठी राबविण्यात येणार्‍या लसीकरण मोहिमेसाठी एमडीएलकडून मिळणार्‍या पाठिंब्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत.


Back to top button
Don`t copy text!