दैनिक स्थैर्य । दि. ०८ डिसेंबर २०२१ । सातारा । शिवराज पेट्रोल पंप ते गोडोली या दरम्यानच्या मार्ग चौपदरीकरणासाठी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे दहा कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे . खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली . सातारा शहरात पूर्वेकडून येणाऱ्या या रस्त्याचे महत्व आणि पर्यटन वृध्दी यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे . या रस्त्याला सीआरएफ फंडातून निधी मिळणार आहे .
जल मंदिर येथून प्रसिध्द झालेल्या पत्रकात नमूद आहे की लिंबखिंड ते खिंडवाडी या राष्ट्रीय महामार्ग सातारा शहरातुन जातो. या रस्त्याच्या दर्जोन्नतीसाठी गेल्या दोन वर्षापासून सातत्याने निधी उपलब्ध करुन घेवून या रस्त्यापैकीमोळाचा ओढा ते करंजे व्हाया एसटी स्टॅन्ड ते गोडोली शिवराज पेट्रोल पंप या रस्त्यापैकी.मोळाचा ओढा ते गोडोली अखेरच्या रस्त्याचे बळकटीकरण करण्यात आलेले आहे. गोडोली नाका ते शिवराज पेट्रोल पंपाचा भाग गतवर्षी नगरपरिषदेच्या हद्दीत समाविष्ट झालेला आहे या रस्त्यावर राज्यपरिवहन विभागाच्या गाड्यांसह, व्यावसायिक वाहनांचा आणि खाजगी वाहनांची मोठया प्रमाणावर वाहतुक सुरु असते. तसेच सातारा शहरा जवळ असणाच्या कास पठार, ठोसेघर आणि भांबवली धबधबा, सज्जनगड, महाबळेश्वर, क्षेत्र महाबळेश्वर, या पर्यटनाच्या दृष्टीनेही अनेक बहिस्थ वाहनांची नेहमीच वर्दळ या रस्त्यावरुन असते . येथील युवा कार्यकर्ते संग्राम बर्गे आणि विलासपूरच्या उदयनराजे मित्र.समुहाच्या कार्यकर्त्यांकडून सदरचा रस्ता रुंदीकरण व सुधारणा होणेकरीता पाठपुरावा होत आहे. या सर्व बाबीचा विचार करुन, सुरक्षित वाहतुकीसाठी गोडोली ते शिवराज पंप अखेर सुमारे 1400 मिटरच्या रस्त्याचे चौपदरीकरण करणे चे काम सन 2022-23 च्या केंद्रीय मार्ग निधी मधुन प्रस्तावित केलेले आहे.
यामध्ये रस्त्याचे चौपदरीकरण,दुभाजक,आरसीसी गटर,फुटपाथ, विदयुतीकरण आदी कामांचा समावेश आहे.देशाचे रस्ते वाहतुक मंत्री ना.नितिन गडकरी यांचेकडे या विकासकामाचा सीआरएफ मध्ये समावेश होणेबाबत रितसर प्रस्ताव पाठवूनमागणी करण्यात आलेली आहे. लवकरचया रस्त्याकरीता सीआरएफ मधुन निधी उपलब्ध होईल आणि या कामाची पुढील कार्यवाही सुरु होईल अशी माहीती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे