नांदेड येथे पोलीस आयुक्तालयाबाबत लवकरच मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव – गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ मे २०२२ । नांदेड । नांदेड येथील वाढलेली लोकसंख्या आणि वाढते महानगर लक्षात घेता येथे पोलीस आयुक्तालयाची मागणी अनेक दिवसांपासून आहे. याबाबत प्रस्ताव शासनाकडे विचाराधीन आहे. आज झालेल्या बैठकीत याबाबत विचारविनिमय करण्यात आला. नांदेड जिल्ह्यात आजघडीला 36 पोलीस स्टेशन आहेत तर महानगरामध्ये 12-14 पोलीस स्टेशन आहेत. एका पोलीस अधीक्षक कार्यालयासाठी हा मोठा भार आहे. नांदेड जिल्हा आणि महानगरातील पोलीस स्टेशनची संख्या लक्षात घेऊन नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाबाबतचा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळापुढे सादर करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले.

नांदेड परिक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा त्यांनी गृह विभागाच्या बैठकीत घेतला. अधिकाऱ्यांकडून सर्व माहिती समजून घेतली. त्यानंतर दुपारी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नांदेड येथील बांधकाम व्यवसायिक संजय बियाणी यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने सुरू आहे. महाराष्ट्रातील पोलीस तपासासाठी सक्षम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी बियाणी कुटुंबियांचीही आज भेट घेऊन त्यांचे म्हणणे समजून घेतले. आरोपी विरुद्ध तपास योग्य त्या दिशेने सुरू असून गुन्हेगारांविरुद्ध लवकरच कारवाई केली जाईल असा विश्वास मी त्यांना दिल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. कायदा व सुव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गुन्हे सिद्धतेचे प्रमाण हे अचूक झाले पाहिजे. याचबरोबर याचे प्रमाणही अधिक वाढले पाहिजे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.


Back to top button
Don`t copy text!