
दैनिक स्थैर्य । दि. १० ऑक्टोबर २०२२ । सातारा । आज ईद-ए-मिलाद म्हणजेच मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त सातारातील सदर बाजार येथे जामा मशीद मधून पारंपारिक पद्धतीने सर्व मुस्लिम बांधवांनी जगाला सुख शांती आणि समृद्धी दे अशी प्रार्थना करत पैगंबर जयंती मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात साजरी केली.
प्रारंभी सदर बाजार येथील जामा मशीद येथे सकाळी 11 वाजता विविध मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी शांतीचे प्रतीक असलेल्या कबुतरे सोडून या जुलूसची सुरुवात झाली, या जुलूस मध्ये मुस्लिम बांधवांबरोबर सर्व समाजातील बांधव उपस्थित होते. सदर बाजार येथील पोलीस चौकी, भारत माता चौक, बागवान गल्ली कुरेशीम गल्ली या मार्गी काढण्यात आला.यामध्ये अबाल वृध्द सहभागी झाले होते, जुलूस मध्ये अनेकांनी शरबतचे वाटप केले, मागील दोन वर्षात करोना काळात निर्बंध असल्यामुळे पैगंबर जयंती साजरी करण्यात आली नव्हती मात्र यंदा सर्व निर्बंध शितील केल्यामुळे आज झालेल्या जुलूस मध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतला होता
दरम्यान जगात प्रेम शांती व सलोखा राहावा व भाईचारा राहावा हा संदेश पैगंबरांनी जगाला दिला आहे हा खरोखरच संदेश प्रत्येक नागरिकांनी पाळला पाहिजे असे यावेळी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सांगितले.
या जुलूस मध्ये सादिक व्यापारी लतिफ चौधरी ,अमजद कुरेशी नजीर बागवान यांनी परीक्षण घेतले तरी उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक माने तसेच सदर बाजार येथील सतीश कांबळे, विजय इंगोले, संजय साठे, गणेश भोसले, विशाल जाधव, चेतन सोळंकी यांच्यासह विविध कार्यक्षेत्रातील नागरिक उपस्थित होते.