दैनिक स्थैर्य | दि. २८ डिसेंबर २०२४ | फलटण |
धुळदेव (ता. फलटण) २३ फाटा येथे २५ व २६ डिसेंबरदरम्यान बंद घर फोडून बेडरुममध्ये ठेवलेल्या पर्समधील रोख रक्कम ११,५०० रुपये व ९,२०० रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा एकूण २०,७०० रुपयांची चोरी केल्याची फिर्याद सुवर्णा अर्जुन ननावरे (वय ४८, रा. २३ फाटा, धुळदेव) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात दिली आहे.
या चोरी प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे करत आहेत.