दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२३ । सातारा । समाजामध्ये सर्व विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळतातच असे नाही प्रवाह बाहेरील मतिमंद विद्यार्थ्यांना योग्य संगोपन योग्य समुपदेशन आणि आरोग्यपूर्ण उपचार यांची गरज आहे अशा विद्यार्थ्यांना प्रवाह ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा भवन संस्थेचे कार्य हे समाजाला दिशा देणारे आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी कोडोली येथील आशा भवन या मतिमंद मुलांच्या शाळेत आरोग्य किटचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी एकनाथ शिंदे यांचे समर्थक आणि अशोका कन्स्ट्रक्शन कंपनीचे सर्वेसर्वा संजय मोरे सातारा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पाटील एकनाथ शिंदे यांचे वडील संभाजी शिंदे बाळासाहेबांची शिवसेना चे शहराध्यक्ष निलेश मोरे पत्रकार सुजित आंबेकर इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले प्रवाह बाहेरच्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक समस्या या अति अडचणीच्या असतात त्यांना योग्य समुपदेशन आणि योग्य शिक्षणाची गरज आहे आशा भवन संस्था गेले कित्येक वर्ष हे काम निष्ठेने करत आहेत अशा विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सप्ताह निमित्त आरोग्यपूर्ण किटचे वाटप करण्यात येत आहे या माध्यमातून त्यांचे योग्य ते पोषण होणार आहे या विद्यार्थ्यांना योग्य दिशा दिल्यास जीवनाच्या प्रवाहात ते सुद्धा मोठी प्रगती करू शकतात निकोप समाजामध्ये अशा विद्यार्थ्यांना सामावून घेतले जाणे गरजेचे आहे त्याकरता अशा संस्थेच्या शिक्षकांनी घेतलेली मेहनत तितकीच कौतुकास्पद आहे या विद्यार्थ्यांसाठी योग्य ती सहकार्य आणि औषधोपचार हे सातत्याने उपलब्ध करून दिली जातील अशी ग्वाही जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिली
यावेळी प्रवीण पाटील प्रास्ताविक करताना म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने आयोजित उपक्रम हा सातत्याने सातारा जिल्ह्यातील वृद्धाश्रम मतिमंद मुलांची शाळा समाज कल्याण विभागाचे वस्तीगृहे सातारा जिल्ह्यातील किशोरवयीन युवती यांच्याकरता वेगवेगळे उपक्रम राबवले जातील शाळकरी आणि महाविद्यालयीन युवक युवतींचे प्रश्न समजावून घेऊन त्याकरता कोणते उपाय योजना करता येतील याची सुद्धा चर्चा सातत्याने केली जात असून तसा आराखडा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून बनवला जात आहे
आशा भवन संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले