दैनिक स्थैर्य । दि. ०२ डिसेंबर २०२२ । फलटण । नांदल येथील फलटण एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय, फलटण यांच्यावतीने फलटण तालुक्यातील नांदल गावात कृषीदुतांकडून गुलाब रोपाचे विविध जातींचे कलम (टी-बडिंग) कसे करावे व त्याचे उत्पादन कसे घ्यावे याचे योग्य मार्गदर्शन स्थानिक शेतकऱ्यांना केले.
यावेळी गावचे नामांकित शेतकरी उपलब्ध होते. कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ. सागर निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक प्रा. नीलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वप्निल लाळगे, प्रा. संजय आडत यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत युवराज काळे, धीरज कणसे, गणेश आवताडे, गणेश बोराटे, विवेक पाठक, ऋषिकेश चव्हाण, पृथ्वीराज बाबर यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत या कृषीदुतांनी नांदल येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.