घराच्या सुरक्षिततेसाठी प्रॉपचेकचा उपक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०४ एप्रिल २०२३ । मुंबई । प्रॉपर्टी ही व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महागडी खरेदी असते आणि प्रत्येक प्रॉपर्टीमध्ये अनेक दोष असतात हे तथ्य आहे. अगदी नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या घरांमध्ये देखील बांधकाम योग्य नसल्याचे दिसून येते. याच कारणामुळे व्यावसायिक एजन्सीकडून होम इन्स्पेक्शन करणे अत्यंत महत्त्वाचे बनते. म्हणूनच घराच्या सुरक्षिततेविषयी सामान्य नागरिकांना जागरूक करण्याच्या उद्देशाने प्रॉपचेक या भारतातील अग्रगण्य होम इन्स्पेक्शन कंपनीद्वारे ७ दिवसीय रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे.

यात होम इन्स्पेक्शन म्हणजे नेमके काय, ते कधी करावे, त्याचे फायदे काय आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी देण्यासाठी प्रॉपचेक बेंगळुरू शहरातील प्रमुख ठिकाणी ७ दिवस रोडशोचे आयोजन करत आहे. या रोड शो दरम्यान प्रॉपचेककडून नागरिकांना मोफत सल्ला व सूट देण्यात येईल तसेच तज्ञांकडून होम इन्स्पेक्शनच्या संकल्पनेबाबत माहिती मिळवण्याची सर्वोत्तम संधी उपलब्ध होईल.

आयआयटी रूर्कीचे माजी विद्यार्थी आणि प्रॉपचेकचे सह-संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ त्यागी म्हणाले, ‘‘आम्ही ग्राहकांच्या फायद्यासाठी रिअल इस्टेट क्षेत्रात अत्यावश्यक पारदर्शकता आणण्यामध्ये आपल्या सरकारने हाती घेतलेल्या उपक्रमासाठी त्‍यांचे कौतुक करतो. रेरा कायदा गृहखरेदीदारांना घर बांधकामामधील दोष बिल्डर्सच्या निदर्शनास आणण्याचा आणि ते दुरूस्त करून घेण्याचा अधिकार देतो. हीच बाब पुढे घेऊन जात प्रॉपचेकमध्ये आम्ही प्रॉपर्टी उत्साहींमध्ये होम इन्स्पेक्शनच्या महत्त्वाबाबत जागरूकता निर्माण करत आमची भूमिका बजावण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही दुय्यम बाजारातून प्रॉपर्टी खरेदी करत असाल किंवा तुम्हाला तुमच्या बिल्डरकडून ताबा मिळत असला तरीही तुमच्या प्रॉपर्टीची खरी स्थिती समजून घेण्यासाठी होम इन्स्पेक्शन करणे अत्यंत आवश्यक आहे. आमचे प्रशिक्षित व पात्र सिव्हिल इंजीनिअर्स तुमच्या प्रॉपर्टीमध्ये ४०० हून अधिक चेकपॉइण्टससह सखोल तपासणी करतात आणि फोटोग्राफिक पुराव्यासह समर्थित सर्व दोषांचे वर्णन करणारा सर्वसमावेशक अहवाल सादर करतात. दोष दूर करण्यासाठी हा अहवाल बिल्डर/कॉन्ट्रॅक्टरकडे नेला जाऊ शकतो, जेणेकरून तुम्ही दोषमुक्त आणि सुरक्षित घरामध्ये जाऊ शकता.’’


Back to top button
Don`t copy text!