
दैनिक स्थैर्य । 18 मार्च 2025। सातारा । ग्राहकांच्या सेवेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर संबंधित विभागाने त्वरीत कार्यवाही करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
सातारा शहरातील वाहतुक नियंत्रणासाठी सविस्तर आराखडा तयार करावा, असे निर्देश देऊन जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, शहरात ज्या ज्या ठिकाणी वाहतुक नियंत्रणासाठी सिग्नल सुरु करावे. नवीन शिधापत्रिकांसाठी शासनाकडे जास्तीचा इष्टांकांची मागणी केली आहे. वाढीव इष्टांकांची मागणी मंजूर झाल्यानंतर नवीन शिधापत्रिका देण्याची कार्यवाही करावी.
ग्राहकांकडून रिक्षा भाडे जास्त आकारणी होवू नये यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी दर जाहीर करावेत. तसेच टो रिक्षाला मिटर आहेत का याची तपासणी करुन टो रिक्षाच्या योग्य दराबाबत रिक्षा संघटना, पोलीस व प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्त बैठक घ्यावी.
विद्युत वितरण कंपनीने मिटर रिडींग नोंदविण्यासाठी व देयक भरण्यासाठी प तयार केला आहे. याचा जिल्हा ग्राहक परिषदेच्या सदस्यांनी वापर करुन इतरांना वापराबाबत जनजागृती करावी. साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. पुढील गळीत हंगामात ऊस वाहतूक करणार्या प्रत्येक वाहनांवर रिप्लेक्टर बसले जातील याची प्रादेशिक परिवहन अधिकार्यांनी खबरदारी घ्यावी, असेही निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी बैठकीत दिले.