
स्थैर्य, सातारा, दि. ०९ : सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे दोन महत्वाचे उपशिक्षणाधिकारी म्हणून ज्यांचा नाव लौकिक होता. त्यांचीच शुक्रवारी पदोन्नतीने बदली झाली आहे. उपशिक्षणाधिकारी हणमंत जाधव आणि उपशिक्षणाधिकारी तथा जावळीचे गटशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांना सहशिक्षण संचालक या पदावर बढती मिळाली आहे. दोन महत्वाचे अधिकारी पदोन्नतीने गेल्याने शिक्षण विभाग रिकामा झाला असून नवीन कोण अधिकारी येणार याकडे उत्सुकता लागून राहिली आहे.
सातारा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात महत्वाची जबाबदारी पार पडणारे व कसलीही समस्या उद्भवण्यापूर्वी त्यातून तोडगा काढून सातारा जिह्याच्या शिक्षण विभागाचा नावलौकिक वाढवण्यासाठी झटणारे म्हणून अशी ओळख आपल्या कार्यातून निर्माण करणारे दोन जाँबाज अधिकारी म्हणजेच उपशिक्षणाधिकारी हणमंत जाधव आणि रमेश चव्हाण हे. जाधव यांनी सातारा जिह्यातील पाटण, वाई, जावली येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कामकाज केले आहे. वाईमध्ये ज्ञानरचनावाद प्रभावीपणे राबवला. तर जावलीचा शिष्यवृत्ती पॅटर्न राज्यभर पोहचवला. पाटण तालुक्यातील शाळांचा दर्जा सुधारणा करण्यासाठी नाविन्यपूर्ण प्रयत्न केले. उपशिक्षणाधिकारी रमेश चव्हाण यांनी सातारा, जावली आणि सातारा जिल्हा परिषद येथे कामकाज केले आहे. जावलीत तंबाखू मुक्त शाळा हा उपक्रम यशस्वी राबवून सर्व शाळा तंबाखू मुक्त केल्याने राज्य भर तालुक्याचे नाव झाले. या दोघांच्या बदल्यामुळे शिक्षण विभाग रिकामा झाला आहे. दरम्यान, मध्यंतरी शिक्षक बदलीची प्रक्रिया क्लिष्ट बनली होती. तेव्हा यांनीच त्यातून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केले.