माहिती संचालकपदी गणेश रामदासी यांना पदोन्नती


स्थैर्य, मुंबई, दि.३१: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक म्हणून श्री. गणेश श्रीधर रामदासी यांची पदोन्नती झाली आहे. मंत्रालयात संचालक (प्रशासन व तांत्रिक कक्ष) या पदावर त्यांची पदस्थापना करण्यात आली आहे.

श्री. रामदासी हे यापूर्वी मराठवाडा विभागाचे माहिती संचालक म्हणून कार्यरत होते. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2001 मध्ये उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर त्यांची प्रथम नियुक्ती दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रमुखपदी झाली होती. केंद्र शासनात प्रतिनियुक्तीवर असताना माजी केंद्रीय राज्यमंत्री श्री. तारिक अन्वर तसेच माहिती व प्रसारणमंत्री श्री.प्रकाश जावडेकर यांच्यासोबत काम करण्याची त्यांना संधी लाभली होती. प्रसारभारतीमध्ये संचालक (प्रशासन) या पदावर त्यांची केंद्रशासनामध्ये सुमारे चार वर्षे प्रतिनियुक्ती होती.


Back to top button
Don`t copy text!