
दैनिक स्थैर्य । दि. १४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील त्या त्या संवर्गातील टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे भाडे दर विचारात घेऊन खाजगी कंत्राटी परवाना वाहनांचे त्या संवर्गासाठी संपूर्ण बसेससाठी येणाऱ्या प्रती कि.मी. भाडेदराच्या 50 टक्क्यांपेक्षा अधिक राहणार नाही असे कमाल भाडे दर शासनाने दि. 24 एप्रिल 2018 रोजीच्या शासन निर्णयानुसार निश्चीत केले आहे. तसेच प्रवाशांनी गर्दीच्या हंगामात प्रवास करतांना येणाऱ्या अडचणीबाबत या कार्यालयाच्या 9420662147 या व्हॉटस्अप क्रमांकावर व [email protected] या ईमेल आयडीवर आपली तक्रार वाहनाचे सुस्पष्ट नोंदणी क्रमांक छायाचित्रासह व प्रवासी तिकीट इत्यादी तपशीलास नोंदवावी.
तसेच परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या [email protected] या इमेल आयडीवरही आपली तक्रार नोंदविता येईल. खाजगी वाहतुकदारांनी निर्धारित करण्यसात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास सदर वाहतुकदारावर मोटार वाहन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल असे, प्र. सहा. प्रादेशिक परिहवन अधिकारी, कराड चैतन्य कणसे यांनी कळविले आहे.