सोयाबीन शेती स्पर्धा परीक्षेत प्रगतशील शेतकरी कल्याण काटे जिल्ह्यात प्रथम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १३ जुलै २०२१ । फलटण । सोयाबीन पीक ऑनलाइन स्पर्धा परीक्षेत सातारा जिल्ह्यातून फडतरवाडी, ता. फलटण येथील प्रगतशील शेतकरी कल्याण काटे यांना प्रथम क्रमांक देवून सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून ४५०० शेतकरी या स्पर्धेत सहभागी झाले होते.
सोयाबीन पीक ऑनलाइन कार्यशाळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना या पिकाविषयी माहिती देवून मार्गदर्शन केल्यानंतर आयोजित स्पर्धा परीक्षेत पेरणी पासून कापणीपर्यंत योग्य पद्धत संदर्भात प्रश्न या ऑनलाइन कार्यशाळेत विचारण्यात आले होते, बरोबर उत्तरे देणारे शेतकऱ्यांना प्रत्येक जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक व बक्षिसे देण्यात आली.

अमीर खान, किरण राव आणि डॉ. अविनाश पोळ यांनी पाणी फौंडेशनच्या माध्यमातून जसे शेतीच्या पाण्यासाठी महाराष्ट्रात उत्कृष्ट काम केले, त्याच पद्धतीने सोयाबीन या नगदी पिकासाठी काम करण्याचा निर्णय पाणी फाउंडेशन टीमने केल्यानंतर महाराष्ट्र शासन, कृषी विद्यापीठे यांच्या सहकार्याने सोयाबीन पीकाविषयी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करुन, प्रशिक्षण, प्रात्यक्षिके, व्याख्याने, चर्चा, प्रश्नोत्तरे अशा प्रकारे काम सुरु केले आहे.

सोयाबीन पीकाविषयी, त्याचे चांगले उत्पादन घेण्यासाठी कृषी विद्यापीठे, शासनाचे कृषी खाते येथील तज्ञ अधिकारी शेतीच्या मशागती पासून माती परीक्षण, बीजप्रक्रिया, पेरणी, खते औषधे, आंतरमशागत यामधील योग्य बारकावे शेतकऱ्यांना ऑनलाईन दर रविवारी सकाळी ११ ते १ सोयाबीनची शेती शाळा या माध्यमातून गेली दोन महिने देत आहेत.


Back to top button
Don`t copy text!