
दैनिक स्थैर्य । 6 एप्रिल 2025। फलटण । गुणवरे ता. फलटण येथील सरस्वती शिक्षण संस्थेचे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात फलटण तालुक्यात तृतीय क्रमांक पटकविला.
गुणवरे सारख्या ग्रामीण भागात कार्यरत असून सुद्धा प्रोग्रेसिव्ह ही शाळा दर दरवर्षी नवनवीन उपक्रमांमध्ये स्पर्धांमध्ये भाग घेऊन उज्वल यश मिळवत असते. या शाळेने तालुकास्तरीय वकृत्व स्पर्धा, तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन, केंद्र, तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा, तसेच इयत्ता पाचवी व आठवीतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.
राज्यात ’मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान शिक्षण विभागाकडून राबविले जाते. राज्यभरातील शाळांचा दर्जा सुधारावा म्हणून या उपक्रमांतर्गत शाळांना बक्षीसे देण्यात येतात. प्रशस्त इमारत, अद्ययावत ग्रंथालय, प्रशस्त क्रीडांगण, स्वच्छ व प्रशस्त स्वच्छतागृहे, हवेशीर व प्रशस्त वर्ग खोल्या, विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग ची सोय, अबॅकस, मंथन, शिष्यवृत्ती, डायमंड टॅलेंट सर्च, ई. सारख्या स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थ्यांकडून करून घेतली जाणारी तयारी, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वर्ग, शाळेचे सुव्यवस्थित नियोजन तसेच शाळेमध्ये असणार्या वेगवेगळ्या सोयी सुविधा या सर्व गोष्टींचा विचार करून राज्य सरकारने शाळेला तृतीय क्रमांक मिळाला आहे.
विशाल पवार म्हणाले, प्रोग्रेसिव्ह स्कूल नेहमीच नवनवीन उपक्रमांसाठी तयार असते. भविष्यातही विद्यार्थ्यांच्या विकासासाठी नेहमी तत्पर असेल. याचे श्रेय शाळेतील शिक्षक वृंदाला जाते. भविष्यातही आपली शाळा नेहमी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी तयार असेल.
या यशाबद्दल सचिव विशाल पवार, संचालिका, सौ. प्रियांका पवार, मुख्याध्यापक किरण भोसले, समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ यांनी सर्व स्टाफचे अभिनंदन केले.