प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल ॶॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोळकी यांना आय. एस. ओ. ९००१ : २०१५ नामांकन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १३ सप्टेंबर २०२२ । फलटण । सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल ॶॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोळकी, ता. फलटण या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित  विद्यालयाने सर्व नियम, निकष सांभाळून आय.एस. ओ. ९००१ :  २०१५ नामांकन प्राप्त केले़ आहे.
मॅनेजमेंट सिस्टिम सर्टिफिकेशन, मेंबर ऑफ मल्टीलेटरल रेक्गनायझेशन अरेंजमेंट, दिल्ली ॶॅक्रीडेशन सेंटर यांच्याद्वारे हे मानांकन प्रमाणित करण्यात आले असून पुढील ३ वर्षाकरीता प्रमाणित आहे. गुणवत्ता हे जिचे ध्येय आहे अशा ह्या संघटनेद्वारे प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल ॶॅण्ड ज्युनिअर कॉलेज, कोळकी यांना आय. एस. ओ. ९००१ : २०१५ मानांकनाद्वारे सन्मानित करण्यात आले आहे.
त्या संदर्भातील प्रमाणपत्र कोअर कमिटीचे अध्यक्ष अनिल लटके यांनी  सरस्वती शिक्षण संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष भिमराव माने, प्रदीप माने   यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले, त्यावेळी संस्थेचे सचिव विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड,  कोषाध्यक्षा सौ. सविता माने, संचालिका सौ. प्रियांका पवार, प्राचार्य संदीप किसवे, पर्यवेक्षक अमित सस्ते, समन्वयिका सौ. माधुरी काटकर, सौ. सुवर्णा निकम, श्रीमती योगिता  सस्ते व शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
वेळेनुसार विद्यालयीन परिवर्तन, आवश्यक व सुधारित कार्यवाही, व्यक्तिगत विकास, उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण, कार्यप्रणाली अशा अनेक अटींची पुर्तता करत सरस्वती शिक्षण संस्थेने गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा हा स्तर सुध्दा पार केला आहे.

Back to top button
Don`t copy text!