
दैनिक स्थैर्य । दि.०९ फेब्रुवारी २०२१ । फलटण । सरस्वती शिक्षण संस्था संचलित विध्यार्थांच्या सर्वांगीण विकासात अग्रेसर असणारे प्रोग्रेसिव्ह काॅन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, गुणवरे येथे जागतिक सूर्यनमस्कार दिन कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास सरस्वती शिक्षण संस्थेचे सचिव विशाल पवार, संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, संस्थेच्या संचालिका सौ. प्रियांका पवार यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले. प्रशालेचे मुख्याध्यापक सुनिल अहिरे, प्रशालेचे पर्यवेक्षक किरण भोसले, समन्वयिका सौ. सुप्रिया सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करून सर्व शिक्षक, विद्यार्थी यांनी सूर्यनमस्कार करून जागतिक सूर्यनमस्कार दिनाचा कार्यक्रम संपन्न केला. प्रशालेच्या शिक्षिका सौ. स्वाती नाळे व सौ. सुप्रिया मदने यांनी सूर्यनमस्काराचे महत्व सांगितले.

