दैनिक स्थैर्य | दि. ४ जून २०२३ | फलटण |
येथील सरस्वती शिक्षण संस्था संचलित, प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अॅण्ड ज्युनिअर कॉलेज या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च-माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला आहे. इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचा शंभर टक्के निकाल लागला असून सलग चार वर्षे या इंग्रजी माध्यमाच्या शाळेने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.
कु. वरद जयवंत कर्वे याने ९६.००% गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. कु.दिग्विजय अनिल कुमार घोरपडे ९५.००% गुण मिळवून द्वितीय तर कु. आदित्य अजित नांदले ९४.८०% गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. कु. वेदा विठ्ठल सोनवलकर ९४.४०% गुण, कु.प्रणव यशवंत ढाणे ९३.००%, कु. क्षितिजा प्रसाद पारवे ९१.८०%, कु. श्रेेया प्रमोद पोतदार ९१.००% गुण संपादित केले आहेत. माध्यमिक शालांत परीक्षा २०२३ साठी एकूण ३० विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २७ विद्यार्थी विशेष प्राविण्य, १ विद्यार्थी प्रथम श्रेणीत व २ विद्यार्थी द्वितीय श्रेणीसह उत्तीर्ण झाले आहेत.
विशेष म्हणजे सरस्वती शिक्षण संस्था संचलित प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज इंग्रजी माध्यमाची शाळा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच मानसिक, शारीरिक, व सामाजिक विकासाच्या दृष्टीने नाविन्यपूर्ण उपक्रमांवर विशेष भर देत आहे. त्याचबरोबर क्रीडा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादित केले आहे. याबद्दल पालकांकडून सरस्वती शिक्षण संस्थेचे विशेष कौतुक होत आहे.
या घवघवीत यशाबद्दल व शाळेचा दहावीचा सलग चार वर्षे व बारावी कॉमर्स सलग दोन वर्षे शंभर टक्के लागण्याची परंपरा ठेवल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक अध्यक्ष श्री. प्रदिप माने, सचिव श्री. विशाल पवार, व्यवस्थापकीय संचालिका सौ. संध्या गायकवाड, कोषाध्यक्ष सौ. सविता माने, संचालिका सौ. प्रियांका पवार, प्राचार्य श्री. अमित सस्ते, पर्यवेक्षिका सौ. माधुरी माने, समन्वयिका सौ. सुवर्णा निकम, श्रीमती योगिता सस्ते, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये इ.११ वी कॉमर्स शाखेसाठी (इंग्रजी माध्यम)प्रवेश प्रक्रिया सुरू असून इ.१० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.