
स्थैर्य, फलटण दि. 30: अत्यंत कडक स्वभाव आणि शिस्तप्रिय, जुन्या पिढीतील प्रा. शिक्षक माधवराव भिकाजीराव खानविलकर यांचे वयाच्या ९९ व्या वर्षी आज (बुधवार) निधन झाले.
येथील जिल्हा परिषद प्रा. शाळेत शिक्षक, नंतर मुख्याध्यापक म्हणून त्यांनी उत्तम काम केले, वर्गात आणि कामात शिस्त असलीच पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष असे, विद्यार्थी वर्गात त्यांच्या शिस्त व कडक स्वभावामुळे दरारा होता, मात्र तरीही ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जात, ते त्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर असलेले लक्ष, त्याला एकादा विषय समजला नाही तर तो समजावून देण्याची त्यांची पद्धत यामुळे ते सहकारी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्या मध्ये आदराचे स्थान असलेले शिक्षक होते.