प्रा. रविंद्र कोकरे यांच्या अस्सल ग्रामीण कथांनी हसवता हसवता डोळ्यांच्या कडा ओलावल्या; अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे औचित्य

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.०४ मे २०२२ । फलटण । ९५ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उदगीर येथे भारतरत्न स्व. लता मंगेशकर साहित्य नगरीत कथाकथन सत्रात अस्सल ग्रामीण कथांनी हसवता हसवता डोळ्यांच्या कडा ओलावून टाकल्या. अध्यक्ष स्थानी आप्पासाहेब खोत होते. सहभागी कथाकार रवींद्र कोकरे, लक्ष्मीकमल गेडाम, अंबादास केदार, राम निकम, सरोज देशपांडे, विजया मारोतकर, माधवी घारपूरे होते.

“दैना” ही सामाजिक जाणिवेची कथा सादर करुन रवींद्र कोकरे यांनी मनमुराद हसवत हसवत काळजाला हात घालून डोळ्यांत पाणी उभे केले. आबा लक्ष्मी  यांना वंशाचे तीन दिवे होते. पण लक्ष्मी वंशाची पणतीसाठी जीव सोडते. आबा लेकरांना लहानाचे मोठे करुन संसाराला लावून मोकळा होतो. तिथूनच सूना आबाची दैना करतात. धनी एक पोरगी पाहिजे होती. हे अंतकाळीचे लक्ष्मीचे बोल आबाच्या काळजात घर करतात. आबा सुदिक चांदीच रुपये सांगून सूनात झालेला बद्दल कोकरे सरांनी हुबेहूब उभा करुन कथेत जान आणली.

शेवटी मुलापेक्षा मुलगी बरी हा सामाजिक आशय देऊन कथा सादर केली. अस्सल ग्रामीण सातारी  बोलीचा बाज, खटकेबाज संवाद, विनोदी प्रसंगाची पेरणी, काळजाला हात घालणारी आशयगहण कथेने सर्वाची मने जिंकली. यावेळी संमेलनाध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, प्रधान सचिव विकास खारगे, सोलापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कथाकथनास हजेरी लावली होती. स्वागत एकनाथ कोपकवडकर, सूत्रसंचालन अनिता येलमटे यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!