
दैनिक स्थैर्य । 27 मार्च 2025। सातारा। येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य पदावर मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांची नियुक्ती करण्यात आली. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये झालेल्या प्राध्यापकांच्या बैठकीत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे, प्रा. डॉ. आर. आर. साळुंखे, प्रा. डॉ. शिवाजी पाटील, उपप्राचार्य डॉ.रामराजे माने देशमुख, प्रा. डॉ. सविता मेनकुदळे, डॉ.संदीप किर्दत, डॉ. राज चव्हाण व विविध विभागाचे प्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.
उपप्राचार्य झाल्याबद्दल सहसचिव प्राचार्य डॉ.शिवलिंग मेनकुदळे, सहसचिव बी. एन. पवार,प्रा.प्रदीप हिवरकर, सुर्यकांत पोरे, सुनील देसाई, राजेंद्र वाघ, प्रदीप कुंभार, श्रीमती श्रावणी बर्गे, प्रा. डॉ. व्हनबट्टे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
डॉ.सुभाष वाघमारे यांचे मळोली (ता. माळशिरस) हे आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा येथे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थी वसतिगृहात त्यांनी 1983 ते 1990 या काळात 11,12 वी सह बी.ए व एम.ए.पदवीसाठी मराठी विषयात त्यांनी शिक्षण घेतले. 1990 ला एम.ए.मराठी विषयात सर्वाधिक गुण मिळवून त्यांनी शिवाजी विद्यापीठात प्रथम क्रमांक मिळविला.
रायगड जिल्ह्यात पनवेल, फुंडे, कर्जत,माढा ,मंचर,लोणंद,पाचवड,येथे त्यांनी मराठीचे प्राध्यापक म्हणून नोकरी केली. याच काळात त्यांनी नेट,सेट,पात्रता परीक्षेत यश मिळवले. तसेच मराठी विषयात पीएच.डी पदवी मिळविली.
अलीकडेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य समजून घेण्यासाठी भेट देणार्या टीममध्ये सहभागी होऊन युके मधील,इंग्लंड देशामधील लंडनच्या लंडन स्कूल ऑफ इकॉनोमिकस, तसेच ग्रेज इन या संस्थाना भेट दिली.‘संविधानाच्या स्वप्नातले गाव’ व ‘मी भारतीय’हे कवितासंग्रह लिहून महाराष्टातील अनेक पुरस्कार त्यांनी मिळविले.
प्रा.बी.डी.पाटील यांचे विषयी गौरव ग्रंथ संपादित केला.