स्थैर्य, सातारा दि. 26 : गोरगरिबांच्या कल्याणासाठी, मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी आणि जातीअंतासाठी आयुष्यभर कार्य करणार्या जोडप्यांना वंदन करण्यासाठी शरद – प्रतिभा हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून या वर्षीच्या पहिल्या पुरस्कारासाठी सातत्याने सामाजिक, शिक्षण, सांस्कृतिक, शेती, अर्थकारण यांच्या माध्यमातून आणि आश्रमशाळांच्या माध्यमातून ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. एन. डी. पाटील व त्यांच्या पत्नी सरोजताई पाटील यांनी कार्य केले आहे. या कार्याचा गौरव म्हणून त्यांना या पुरस्काराचे वितरण मंगळवार दि. 29 डिसेंबर रोजी सायंकाळी साडे चार वाजता कोल्हापूर येथे सिक्किमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते व नाबार्ड चे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे, असे मी कास्ट फ्री मुव्हमेंट चे अध्यक्ष लेखक व दिग्दर्शक डॉ. प्रशांत गेडाम यांनी सांगितले.
महाराष्ट्राचा पुरोगामी विचार संस्कृती चेहरा टिकवण्यासाठी ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांचे फार मोठे योगदान आहे आणि यामध्ये त्यांच्या पाठीशी त्यांच्या सुविद्य पत्नी प्रतिभाताई खंबीरपणे उभे राहून साथ देत आहेत. म्हणूनच शरद पवार यांच्या जन्मदिनी त्यांच्या व प्रतिभाताईंच्या नावाने शरद – प्रतिभा पुरस्कार पती – पत्नी च्या जोडिला जाहीर करण्यात आला आहे. शरद – प्रतिभा पुरस्काराचे स्वरूप स्मृतिचिन्ह व मानपत्र रोख रक्कम रुपये पन्नास हजार आणि सत्यशोधक पोषाख, शाल असे आहे. डॉ. प्रशांत गेडाम यांनी सांगितले
कोल्हापूर येथे मंगळवारी ( दि.29) साडेचार वाजता राजश्री शाहू कॉलेज, येथे होणा-या या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून रयत शिक्षण संस्थेच्या दक्षिण विभागाचे अध्यक्ष माधवराव मोहिते असतील.
यावेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य एम.बी.शेख, राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील व राज्य समन्वयक संतोष साखरे, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार विजय मांडके हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हा पुरस्कार वितरण समारंभ साध्या पध्दतीने व निमंत्रितांच्या उपस्थितीत होईल असे संयोजक डॉ. प्रशांत गेडाम व सर्जेराव वाघमारे यांनी सांगितले.