छत्रपती शिवाजी कॉलेजच्या प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे यांना रयतचा ‘यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ प्रदान

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १४ मे २०२३ । सातारा । येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ ,सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजचे उपप्राचार्य व विद्यापीठाच्या मानव्यविद्या विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ.अनिलकुमार वावरे यांना रयत शिक्षण संस्थेचा गुणवत शिक्षकासाठी असलेला ‘यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार’ ९ मे २०२३ रोजी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.शरदचंद्रजी पवार यांचे हस्ते देण्यात येऊन त्यांचा गौरव करण्यात आला.डॉ.अनिलकुमार वावरे यांनी पत्नी डॉ.सविता वावरे यांचे समवेत पुरस्कार स्वीकारला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष पवार साहेब व चेअरमन डॉ. अनिल पाटील इत्यादी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. रयत शिक्षण संस्थेत या पुरस्कारासाठी अर्ज केलेल्या शिक्षकाच्या विविध प्रकारच्या गुणवत्ता लक्षात घेऊन त्याचे मुल्यांकन करून महाविद्यालय स्तरावर एक व विद्यालयीन स्तरावर एक असा ‘ यशवंतराव चव्हाण आदर्श शिक्षक पुरस्कार ‘ दिला जातो. या वर्षी महाविद्यालयीन स्तरावरील पुरस्कार डॉ.अनिलकुमार वावरे यांना देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप रुपये ५१००० ,प्रमाणपत्र ,सन्मानचिन्ह, शाल व बुके असे होते. यातील ५१००० रुपयांचा चेक ‘कमवा आणि शिका ‘योजनेस डॉ.वावरे यांनी देणगी म्हणून दिला. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य व रयत शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विठ्ठल शिवणकर ,प्राध्यापक स्टाफ व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.


Back to top button
Don`t copy text!