दैनिक स्थैर्य । दि. 08 डिसेंबर 2021 । फलटण । विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या थोर इतिहाची महिती मिळावी या हेतूने सोनगाव मधील युवकांनी किल्ले स्पर्धेचे आयोजन केले होते. त्याचे बक्षीस वितरण नुकतेच संपन्न झाले. कर्यक्रमास राजाळेचे माजी सरपंच संभाजी निंबाळकर, महावीर भालेराव, रमेश जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांचे लहान गट व मोठा गट करून ही स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये जवळपास 33 विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट किल्ले बांधून व त्या संदर्भातील प्रश्नांची उत्तरे देऊन ही स्पर्धा उल्लेखनीय बनवली. या स्पर्धेतील विजेते खालीलप्रमाणे
मोठा गट – प्रथम क्रमांक – निनाद विनोद नलावडे
द्वितीय क्रमांक – प्रणव सतीश गोरवे
तृतीय क्रमांक- समृद्धी बाबासो लवटे
तृतीय क्रमांक- आर्यन प्रशांत काकडे
लहान गट – प्रथम क्रमांक- हर्षल सुरेश पवार
द्वितीय क्रमांक- वैशाली लक्ष्मण गायकवाड
तृतीय क्रमांक- वर्धन बन्सी ननावरे
सहभागी सर्वच स्पर्धकांना उत्तेजनार्थ आकर्षक बक्षिसे देण्यात आली.
यावेळी 30 वर्षे सेवा बजावणारे ग्रामपंचायत सोनगाव चे सेवानिवृत्त कर्मचारी सुरेश कोंडीबा गेजगे यांचाही सेवानिवृत्तीपर सत्कार संपन्न झाला.
यावेळी सोनगावचे माजी सरपंच पोपटराव बुरुंगले यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. राजेश निकाळजे यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार जिल्हा परिषद शाळा राजाळेचे मुख्याध्यापक धनाजी मोरे यांनी मानले.
या कार्यक्रमास दत्तात्रय ननावरे, रमेश मदने, राहुल गायकवाड, दिलीप भंडारे, लखन पिंगळे, संतोष गोरवे, गणेश कांबळे, बाबासो लवटे, धर्मराज लांडगे, संतोष आडके, राहुल यादव, विनोद नलावडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.