
स्थैर्य, फलटण, दि. १० सप्टेंबर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष फलटण शहर महिला आघाडीच्या वतीने आयोजित भव्य गौरी-गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी (दि. ९) येथील श्री उपळेकर महाराज मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत सौ. रूपाली पोतेकर यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
जिल्हा संघटिका कल्पनाताई गिड्डे आणि शहर संघटिका लताताई तावरे यांच्या प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वी झाला. या कार्यक्रमासाठी शिवसेना उपनेत्या सौ. छायाताई शिंदे, फलटण पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाच्या पोलीस उपनिरीक्षक पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विकास नाळे, सहसंपर्क प्रमुख सुशीला जाधव, तालुका संघटक नंदकुमार काकडे, शिव आरोग्य सेना जिल्हा सचिव शैलेंद्र नलवडे, शहर संघटक अक्षय तावरे, उपशहर संघटक मंगेश खंदare, सामाजिक कार्यकर्त्या पूजाताई निकाळजे, सागर निकाळजे आणि स्पर्धेच्या पंच सौ. प्रीतीताई भोजने उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे:
- प्रथम क्रमांक: सौ. रूपाली पोतेकर
- द्वितीय क्रमांक: सौ. पूजा मेनकुदळे
- तृतीय क्रमांक: सौ. पूनम पोतेकर
याशिवाय चौथा ते सातवा क्रमांक, पंधरा उत्तेजनार्थ बक्षिसे आणि सहभागी प्रत्येक स्पर्धकाला भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.