दैनिक स्थैर्य । दि. ०३ एप्रिल २०२३ । म्हसवड । एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरी प्रकल्प सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने माण तालुक्यातील अंगणवाडी क्रमांक १०२ कोष्ट गल्ली म्हसवड येथे आंतरराष्ट्रीय तृणधान्य व भरड धान्य वर्ष 2023 च्या अनुषंगाने पोषण पंधरवडा साजरा करण्यात आला. त्यामध्ये घेतलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम व गायत्री फुटाणे यांनी घेतलेल्या मेहंदी कोर्स चे प्रमापत्र वितरण अभियंता सुनील पोरे व सौ. सुवर्ण पोरे व तरंग रेडिओ वॄतनिवेदिका कांचन ढवण यांच्या हस्ते प्रमाण पत्र प्रदान करण्यात आले. प्रस्ताविक अश्विनी फुटाणे केले. यावेळी तॄण व कडधान्ये शरीरास किती गरजेच्या आहेत. याची माहिती दिली. याप्रसंगी सौ प्रियांका नामदास,कांचन ढवण यांनी मनोगत व्यक्त केले. श्री. पोरे यांनी आपले मनोगतात सामान्य माणूस केंद्र बिंदू मानून केलेले व करावयाचे योजना बाबत माहिती दिली. अंगणवाडीसाठी लागेल ती मदत करु असे ही म्हटले. स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. बक्षीस मिळाले ते बक्षीसारथी पुढीलप्रमाणे “२०२२-२३ तृणधान्य विशेष बक्षीस पात्र नावे”
१. स्वस्त बालक स्पर्धा
मोठा गट – ज्ञानदा महेश कवडे
लहान गट – अद्विक सचिन कलढोणे
२. रांगोळी सीनियर स्पर्धा
प्रथम क्रमांक – पूजा खटावकर
द्वितीय क्रमांक – रोहिणी खटावकर
३. रांगोळी ज्युनियर स्पर्धा
प्रथम क्रमांक – विशाखा कवडे
द्वितीय क्रमांक – अनुष्का कलढोणे
४. तृणधान्य घोषवाक्य स्पर्धा
प्रथम क्रमांक – मनीषा भंडारे
द्वितीय क्रमांक – वेदांती भागवत
५. तृणधान्य निबंध स्पर्धा
प्रथम क्रमांक – पोर्णिमा पोरे
द्वितीय क्रमांक – प्रियांका नामदास
यावेळी अतुल फुटाणे, शार्दुल फुटाणे,श्रीमती माने,सौ रोकडे,सौ नामदास,सौ भागवत,सौ कवडे,सौ खटावकर,सौ गोंजारी आदी महिला पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते . उपस्थितांचे स्वागत व आभार मैथिली फुटाणे हिने मानले.