प्रियांका मोहितेची कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२२ । सातारा । साताऱ्याची एव्हरेस्ट कन्या आणि राष्ट्रीय पातळीवरची गिर्यारोहक पट्टू प्रियांका मोहिते यांच्या कुटुंबीयांच्या वतीने जागतिक दर्जाचे गिर्यारोहक सानू शेरपा आणि पात्संग तेन्जे यांचा साताऱ्यात भावपूर्ण सत्कार करण्यात आला. प्रियंकाच्या आगामी धौलाकुवाँ या मोहिमेत सहभागी झालेल्या पायोनियर संस्थेचे संचालक पात्संग यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रियांका मोहितेची कामगिरी वेगवेगळ्या माध्यमातून उंचावणार असल्याची स्पष्ट ग्वाही सातारकरांना दिली.

मूळचे नेपाळचे असणारे प्रख्यात शिरपा सानू शेरपा यांनी जगातील आठ हजार मीटर पेक्षा उंच असणारी 14 शिखरे दोन वेळा सर केली आहेत याशिवाय पायोनियर संस्थेचे संचालक पात्संग तेंजे यांनी प्रियांका मोहितेच्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये कायमच तिच्या मोहिमेचे संचलन केले आहे या दोन्ही आंतरराष्ट्रीय गिर्यारोहकांचा सत्कार मोहिते कुटुंबीयांच्या वतीने शाल श्रीफळ कंदीपेढे आणि गुलाबाचे फुल देऊन सत्कार करण्यात आला.

प्रियांका मोहिते हिचे मार्गदर्शक आणि मुंबईचे अनुभवी गिर्यारोहक पट्टू आनंद शिंदे तसेच प्रियंकाचे साताऱ्यातील मार्गदर्शक व सह्याद्री ट्रेकिंग इन्स्टिट्यूट चे एस एस बागल यावेळी उपस्थित होते या भावपूर्ण आणि छोटेखानी कार्यक्रमात प्रियांकाने आपल्या गिर्यारोहण छंदाचा छोटासा प्रवास मोजक्या शब्दात उलगडला सत्कार स्वीकारल्यानंतर गदगदलेल्या स्वरात बोलताना पासंग तेंन्जे म्हणाले गिर्यारोहणामध्ये मानसिक संतुलन शारीरिक क्षमता सुरक्षितता आणि प्रतिकूल परिस्थितीत निसर्गाची लढण्याची क्षमता या गुणांचा विकास होणे गरजेचे आहे महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या मातीमध्ये या सर्व गुणांचा वेगळा समन्वय आहे प्रियंका मोहिते हे त्याचे चालते बोलते उदाहरण आहे प्रियंकाने आत्तापर्यंत पाच यशस्वी मोहिमा 8000 मीटर उंचीच्या पर्वतांवर केले आहेत यापुढेही पायोनियर संस्थेच्या माध्यमातून आम्ही तिच्या मागे भक्कमपणे उभे आहोत प्रियंकाची कामगिरी आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल या पद्धतीने तिच्या पुढील वाटचालीसाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे स्पष्ट प्रतिपादन तेंन्जे यांनी केले.

सानू शेरपा यांनी सुद्धा प्रियांका मोहितेच्या धाडसाचे कौतुक केले ते म्हणाले तीन वर्षांपूर्वी 2019 च्या मोहिमेमध्ये आमची ओळख झाली तेव्हापासून मी प्रियंकाची वाटचाल बघतो आहे निसर्गाचा कल ओळखून अत्यंत लवचिकपणे गिर्यारोहण करणारी प्रियांका हिची मानसिकता वेगळ्या पद्धतीची आहे अत्यंत शिस्तबद्ध आणि संयमाने कोणतीही परिस्थिती हाताळणारी प्रियंका ही जगातल्या कोणत्याही कठीण अशा हिमकड्यांवर यशस्वीपणे चढाई करू शकते असा आमचा विश्वास आहे.

प्रियांका मोहिते सध्या बेंगलोर येथे एका फार्मासिस्ट कंपनीमध्ये संशोधन आणि विकास विभागांमध्ये सायंटिस्ट म्हणून काम करत आहे 11 महिने काम आणि एक महिना गिर्यारोहण असे वेळापत्रक देणे तयार करून घेतले आहे येत्या मार्च एप्रिलमध्ये ती धौलाकुवाँ या नेपाळमधील हिमशिखरावर चढाई करण्यासाठी सज्ज झाली आहे त्यासाठी तिचा रोज व्यायाम सुरू आहे या मोहिमेसाठी तब्बल 18 लाख रुपये खर्च येणार आहे या मोहिमेसाठी सातारकरांसह महाराष्ट्रातील दानशूर लोकांनी आर्थिक सहकार्य करावे असे आवाहन यावेळी प्रियांका मोहिते मित्रपरिवार च्या वतीने करण्यात आले आहे कार्यक्रमांमध्ये मोहिते-परिवाराच्यावतीने आनंद शिंदे प्रियंका मोहितेचे वडील मंगेश मोहिते सह्याद्री ट्रेकर्सचे एस एस बागल सर या सर्वांचा सत्कार करण्यात आला.


Back to top button
Don`t copy text!