
स्थैर्य, फलटण, दि. 17 ऑगस्ट : फलटण शहरातील सर्वात जुन्या आणि मानाच्या समजल्या जाणाऱ्या शुक्रवार पेठ तालीम गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी प्रितम चंद्रकांत बेंद्रे (आबा) यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत ही निवड एकमताने जाहीर करण्यात आली.
या बैठकीमध्ये मंडळाच्या आगामी वर्षासाठीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. प्रारंभी, मागील वर्षाचे खजिनदार बाळासाहेब भट्टड यांनी ताळेबंद सादर केला. त्यानंतर, मावळते अध्यक्ष फिरोज आतार यांनी नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीची सूचना मांडली, ज्याला निलेश खानविलकर आणि श्रीकांत पालकर यांनी अनुमोदन दिले.
बैठकीचे अध्यक्ष राहुल जगन्नाथ निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या निवड प्रक्रियेत सर्व पदे बिनविरोध निवडण्यात आली. नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे:
- अध्यक्ष: प्रितम चंद्रकांत बेंद्रे (आबा)
- उपाध्यक्ष: नरेश पालकर, विजय पोतदार, सुमित मठपती
- सेक्रेटरी: अमित कर्वे (बाप्पा), राजेंद्र चंद्रकांत कर्वे, हुजेफ मणेर
- खजिनदार: बाळासाहेब रमाकांत भट्टड, राहुल जगन्नाथराव निंबाळकर (काका)
या निवडीनंतर सर्व कार्यकर्त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.