
दैनिक स्थैर्य । 9 मे 2025। फलटण । फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी(बेडके) यांच्या प्रयत्नातून पुणे विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार जयंत दि. आसगावंकर यांच्या स्थानिक विकास निधीतून यशवंतराव चव्हाण हायस्कूल येथे संगणक प्रिंटरचे वाटप करण्यात आले.
यावेळी महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके), सुरेश देसाई , प्रा. सुहास चौगुले, आर. जी. कांबळे आदी मान्यवर व माध्यमिक शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, फलटण तालुक्यातील 30 माध्यमिक शाळांना प्रिंटरचे वाटप करण्यात आले.