९ सर्कल येथे प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेक व्याख्यानमालेचे आयोजन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २५ डिसेंबर २०२२ । फलटण । 9 सर्कल, साखरवाडी, ता.फलटण येथील तत्त्वबोध विचार मंचच्या वतीने प्राचार्य शिवाजीराव भोसले विवेक व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून सोमवार, दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 6: 30 वाजता जिल्हा परिेद प्राथमिक शाळा प्रांगण, 9 सर्कल येथे व्याख्यानमालेचे उद्घाटन महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य तथा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधी रविंद्र बेडकिहाळ यांच्या हस्ते संपन्न होणार असल्याचे संयोजकांच्यावतीने सांगण्यात आले.

तत्त्वबोध विचार मंच, जय हनुमान तरुण मंडळ, शिवरौद्र प्रतिष्ठान व शिवतेज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या व्याख्यानमालेच्या उद्घाटन सत्रात सोमवार, दि.26 रोजी सायंकाळी 6:30 वाजता निसर्गतज्ज्ञ व पर्यावरणप्रेमी पत्रकार अभिजीत घोरपडे यांना प्रा.शिवाजीराव भोसले विवेक जागर पुरस्काराचे वितरण होणार असून यावेळी त्यांचे ‘नाते पर्यावरणाशी’ या विषयावर व्याख्यान संपन्न होणार आहे. रात्री 8 नंतर वंडर्स ऑफ युनिव्हर्स, पुणेचे संचालक कृष्णा गायकवाड यांच्या मार्गदर्शनात दुर्बिणीतून चंद्र पाहणे, इतर ग्रहगोल आणि अवकाश निरीक्षणाचा अनुभव देण्यात येणार आहे.

मंगळवार, दि.27 रोजी सायंकाळी 6 वाजता ग्रंथ दिंडी व विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम संपन्न होणार असून सायंकाळी 7 वाजता मराठा समाजाची सद्यस्थिती आणि प्रश्‍न या संदर्भाने ‘बदलते जातवास्तव’ या विषयावर विशेष परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. सदर परिसंवादात पुणे येथील लेखक सुशिलकुमार धसकटे, आबासाहेब गरवारे कॉलेज, पुणेचे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ.प्रदिपकुमार माने, मुधोजी महाविद्यालय, फलटणचे तत्त्वज्ञान विभाग प्रमुख प्रा.डॉ.नवनाथ रासकर हे सहभाग घेणार आहेत.

व्याख्यानमालेच्या समारोपाच्या सत्रात बुधवार, दि.28 रोजी सायंकाळी 7 वाजता स्त्रियांच्या दैनंदिन प्रश्‍नांचा हसत – खेळत आढावा घेणार्‍या मूळ इटालियन नाटकाचा मराठी भाषेत अनुवाद असणारे ‘कडेकोट कडेलोट’ हे एकपात्री नाटक संपन्न होणार असून त्यानंतर दिग्दर्शक कल्पेश समेळ (कोल्हापूर) व त्यांच्या टीमशी संवाद कार्यक्रम पार पडणार आहे.

तरी सदर व्याख्यानमालेचा लाभ घेण्यासाठी साखरवाडी पंचक्रोशीतील ग्रामस्थांसह तालुक्यातील साहित्य, संस्कृती, शिक्षण प्रेमी नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन कार्यवाहक महेश यादव, विजय यादव, स्वप्निल बनकर, अक्षय नलवडे, रोहित मांढरे, जयवंत मांढरे, ज्ञानेश्‍वर ढेकळे, सुरज डांगे, अक्षय यादव, अक्षय मदने, संजय बुधावले, शहाजी जगदाळे, नितीन शिंदे, मोहसिन मणेर, समिर हुसेन आदींनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!