पंतप्रधानांचा मध्यप्रदेशातील पथ विक्रेत्यांशी 9 सप्टेंबर रोजी `स्वनिधी संवाद`

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, सातारा, दि.८: पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर 2020 रोजी मध्यप्रदेश येथील पथ विक्रेत्यांशी `स्वनिधी संवाद` साधणार आहेत.

कोविड – 19 मुळे व्यवसायावर परिणाम झालेल्या रस्त्यावरील विक्रेत्यांची उपजीविका पूर्ववत करण्यासाठी भारत सरकारने पीएम स्वनिधी योजना 1 जून 2020 रोजी सुरू केली.

मध्यप्रदेश मध्ये अशा 4.5 लाख रस्त्यावरील विक्रेत्यांनी (फेरीवाले) आपली नोंदणी केली, 4 लाखाहून अधिक विक्रेत्यांना ओळख आणि विक्रेत्याचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे. 2.45 लाख पात्र लाभार्थ्यांचे अर्ज पोर्टलमार्फत बँकांना सादर करण्यात आले आहेत, त्यापैकी 1.4 लाख विक्रेत्यांना 140 कोटी रुपये देण्यात आले आहेत. एकूण प्राप्त केलेल्या अर्जांपैकी मध्यप्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे, पहिले राज्य आहे, याच राज्यातून 47 टक्के अर्ज येत आहेत. राज्यातील योजनेच्या लाभार्थींसाठी सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम पाहण्याची सोय 378 नगरपालिकांमधील एलईडी स्क्रीनद्वारे करण्यात आली आहे. 

हा कार्यक्रम वेबकास्टच्या माध्यमातून प्रदर्शित केला जाणार आहे, ज्याच्याठी पूर्व नोंदणी माय-गव्ह (MyGov) च्या https://pmevents.ncog.gov.in/ या लिंकवर केली जात आहे.

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री, श्री शिवराज सिंह चौहान, देखील व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!