खरीप पिकांसाठी प्रधानमंञी पीक विमा योजना

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२२ । मुंबई । सन 2022-23 पासून शासनाने औरंगाबाद जिल्हयात  भारतीय कृषि विमा ही कंपनी खरीप व रब्बी हंगामासाठी निश्चित केली असून सन 2022-23 पर्यंत सर्व हंगामासाठी ही कंपनी जिल्हयात कार्यरत राहणार आहे. ही कंपनी अधिसूचित क्षेञातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेञ घटकासाठी विमा संरक्षण व विमा नुकसान भरपाईसाठी  शेतकऱ्यांना मदत व मार्गदर्शन करेल.

सन 2022-23 साठी शासनाने 80:110 या बीड पॅटर्ननुसार राज्यात प्रधानमंञी पिक विमा योजना लागू असून या मध्ये जर पिकांचे नुकसान झाले नाही तर कंपनीस सेवा म्हणून एकूण विमा हप्त्याच्या 20 टक्के रक्कम देण्यात येईल व उर्वरित रक्कम कंपनी राज्यशासनाकडे परत करणार आहे. जर पिकांचे नुकसान झाले तर कंपनी जमा विमाहप्त्याच्या 110 टक्के पर्यंत नुकसान भरपाईची रक्कम देईल व उर्वरित नुकसान भरपाई राज्यशासन देईल.

सन 2022-23 च्या खरीप हंगामात विमा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 ही आहे.

   1)योजनेची उद्दिष्टे

  • नैसर्गिक आपत्ती , कीड, आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे.
  • शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंञज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  • पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.
  • कृषि क्षेञासाठीच्या पत पुरवठ्यात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतकऱ्यांच्या संरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विवि‍धीकरण यातून कृषि क्षेञाचा गतिमान विकास व  वाढ हे हेतू साध्य होण्यास मदत होईल.

2)योजनेची वैशिष्टे :

  • कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ही योजना  ऐच्छिक आहे.
  • खातेदाराचे व्यतिरिक्त कुळांसाठी सुध्दा ही योजना खुली ठेवण्यात आलेली आहे.
  • शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम 2 टक्के रब्बी हंगाम 1.5 व नगदी पिकांसाठी 5 टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.
  • या योजनेअंतर्गत 70 टक्के जोखिमस्तर देय राहील.
  • अधिसूचित क्षेञातील अधिसूचित पिकाचे उंबरठा उत्पन्न म्हणजे मागील 7 वर्षातील जास्त उत्पन्नाचे 5वर्षाचे सरासरी उत्पन्न गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचाराता घेऊन निश्चित केले जाईल.

3) योजनेत सहभागी शेतकरी :-

जे शेतकरी विविध वित्त संस्थांकडून पीक कर्ज घेतात अशा शेतकऱ्यांनी विमा भरण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस पूर्वी आपण कर्ज घेतलेल्या पिकांसाठी योजनेत सहभागी होणार नाहीत असे लेखी न दिल्यास वित्तीय संस्थेकडून विमा हप्ता कर्ज खात्याकडून वजा केल्या जाईल. बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजना ऐच्छिक राहील.

4) विमा संरक्षण मिळण्याच्या बाबी :-

पीक पेरणी पासुन काढणी पर्यंतच्या कालावधीत  नैसर्गिक आग, वीज कोसळणे , गारपीट चक्रीवादळ, पूर ,भुस्खलन

दुष्काळ पावसातील खंड कीड व रोग इ. मुळे पिकांच्या नुकसानीस विमा संरक्षण दिले जाईल.

4.1 हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत हवामान घटकामुळे पेरणी/लावणी उगवन न होणे.

अपूरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे अधिसुचित मुख्य पिकांची अधिसुचित क्षेञात

व्यापक     प्रमाणावर (75 टक्क्यांपेक्षा जास्त ) पेरणी/लावणी न झालेल्या क्षेञासाठी एकुण विमा संरक्षित रक्कमेच्या

25 टक्के विमा    संरक्षण देय राहिल.

4.2 स्थानिक आपत्ती :-

स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची तसेच चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/ काढणी नंतर

सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसुचित पिकाचे नुकसान झाल्यास सदरची माहिती कर्जदार शेतकऱ्याने 48

तासांत व बिगर कर्जदार शेतकऱ्याने 72 तासांत संबंधित बँक /वित्तीय संस्था/विमा कंपनी यांना देणे आवश्यक आहे.

   4.3 हंगामातील प्रतिकुल परिस्थितीत झालेले नुकसान (मिड सिझन अॅडव्हरसिटी )

हंगामातील  प्रतिकुल परिस्थिती माञ काढणीच्या 15 दिवस आधी पर्यंत पूर, पावसातील खंड इत्यादी बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनात मागील 7 वर्षांच्या सरासरी उत्पादनाच्या 50 टक्के पेक्षा जास्त घट असेल तर विमा संरक्षण लागू राहील.

  4.4 काढणी पश्चात नुकसान :-

चक्रीवादळ, अवेळी पाऊस यामुळे कापणी/ काढणी नंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे

नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई  निश्चित केली जाईल. सदरचे नुकसान काढणी/

कापणी झाल्यानंतर जास्तीत जास्त 14 दिवस नुकसान भरपाईस पाञ राहील.

       4.5 उत्पनांवर आधारीत नुकसान :-पीक कापणी प्रयोगाच्या उत्पन्नावर आलेल्या सरासरीनुसार जर सरासरी उत्पन्न

उंबरठा उत्पन्नापेक्षा कमी असेल तर त्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळेल.

      5) विमा संर‍क्षीत रक्कम :-

या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी पिकनिहाय  विमा संरक्षण हे पिकनिहाय प्रति हेक्टरी मंजूर कर्ज

मर्यादेपर्यंत  राहिल.

       6) विमा हप्ता दर व विमा हप्ता अनुदान :-

या योजनेअंतर्गत निश्चित करण्यात आलेला पिक निहाय प्रति हेक्टर विमा हप्ता दर व शेतकऱ्यांनी प्रत्यक्षात भरावयाचा विमा

हप्ता या मधील फरक हा सर्वसाधारण विमा हप्ता अनुदान समजण्यात येईल.  हे अनुदान केंद्र व राज्यशासनामार्फत

सम प्रमाणात  दिले  जाईल.

4    पिक कापणी प्रयोग आयोजित करणे तसेच पिकांच्या उत्पन्नाच्या अंदाजासाठी अत्याधुनिक तंञज्ञान उदा. रिमोट सेन्सिंग टेक्नॉलॉजी ( R.S.T.), स्मार्टफोन इ. चा वापर करणे तसेच उपग्रह छायाचिञ, एम. एन. एफ . सी. चे अहवाल व ड्रोन या बाबींचा वापर करण्यात येणार आहे.  तसेच सर्व यंञणातील कर्मचाऱ्यांनी पीक कापणी प्रयोग करतांना अॅप वापर करणे बंधनकारक आहे.

5     खरीप व रब्बी हंगाम 2022-23 करीता भात सोयाबीन व कापूस पिकांकरीता पीक कापणी प्रयोगाव्दारे प्राप्त उत्पन्न यास 90 टक्के भारांकन तांञिक उत्पादनास 10 टक्के भारांकन देऊन उत्पादकता निश्चित  करण्यात येणार आहे.

6     ई-पिक पाहणी अंतर्गत पिकांची नोंद करण्यात यावी विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई-पीक पाहणी मध्ये नोंदवलेले पीक यामध्ये तफावता असल्यास ई- पीक पाहणीमध्ये नोंदवलेले पीक अंतिम ग्रहित धरण्यात येईल.

        विमा कंपनी :- भारतीय कृषि विमा कंपनी , जिल्हा औरंगाबाद   

        पिक निहाय विमा संरक्षित रक्कम आणि शेतकऱ्यांने भरावयाचा विमा हप्ता रक्कम.

पीक विमा संरक्षित रक्कम विमा हप्ता दर (टक्के) एकूण विमा हप्ता रक्कम रु. शेतकरी विमा हप्ता रक्कम रु.
ख. ज्वारी 31050 19 5899.50 621
बाजरी 27600 18 4968.00 552
सोयाबीन 56350 15 8452.50 1127
मूग 24150 17 4105.50 483
उडीद 24150 24 5796.00 483
तूर 36802 28 10304.56 736.04
कापूस 59800 14 8372 2990
ख. कांदा 81422 9 7327.98 4071.10
मका 35598 21 7475.58 711.96

 

  • जोखिमस्तर सरासरी उत्प्‍ान्नाच्या  70 टक्के .
  • कांदा व कापूस या पिकांसाठी शेतकरी विमा हप्ता 5 टक्के दराने आहे. इतर पिकांसाठी 2 टक्के आहे व उर्वरीत रक्कम केंद्र व राज्य प्रत्येकी 50 टक्के आहे.
  • प्रत्येक स्वतंञ किंवा एकञ महसुल मंडळात किमान 10 व तालुका घटकात किमान 16 प्रयोगांचे उत्प्‍ान्न्‍ा येणे आवश्यक आहे तर आणि तरच ती आकडेवारी विमा कंपनी ग्राहृय धरते. व उंबरठा उत्प्‍ान्नाच्या आकडेवारीशी तुलना करुन खालील सुञानुसार विमा मंजूर करते किंवा नाकारते.

(उंबरठा उत्पन्न– प्रत्यक्ष आलेले सरासरी उत्पन्न)

नुकसान भरपाई रु.=    —————————————          ×  विमा संरक्षित रक्कम

उंबरठा उत्पन्न

 

 

पीक विम्यातून नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतक-यांनी घ्यावयाची दक्षता

1. शेतकऱ्यांनी  31जुलै 2022 पर्येत अर्ज करावेत.

2. पीक विमा अर्ज भरण्यासाठी शेतक-याचे आधार कार्डची प्रत,  7-12 उतारा,  पेरणी घोषणापत्र  व बँक पासवुकाची प्रत आवश्यक आहे.

3.योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांनी स्थानिक आपत्ती तसेच काढणी पश्चात नुकसानीची घटना घडल्यापासून 72 तासांच्या आत याबाबत सुचना विमा कंपनी /संबंधीत बँक/कृषि/महसूल विभाग किंवा टोल फ्री क्रमांक व PMFBY पोर्टलवर देण्यात यावा. नुकसानीची सुचना मिळाल्यानंतर कंपनीचा प्रतिनिधी येऊन त्याची  खात्री करणार असल्यामुळे नुकसान झालेले क्षेत्रच कळवावे.

4.ई-पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंद करण्यात यावी. व जे पीक  पेरले असेल त्याच पिकाचा व क्षेत्राचा विमा भरावा.

तरी सर्व शेतकऱ्यांनी 31 जुलै 2022 या अंतिम मुदतीच्या आत आपल्या पिकांचा विमा भरावा.अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या संबंधित कृषि सहाय्य्क, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, विमा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क साधावा व मोठ्या संख्येनी योजनेस सहभागी होऊन नैसर्गिक आपत्ती पासुन संरक्षण कवच मिळवावे.

 

–सुनील चव्हाण भाप्रसे, M.Sc. (Agri)

जिल्हाधिकारी,औरंगाबाद.


Back to top button
Don`t copy text!