प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘फ्रीडम पार्क ते खापरी’ दरम्यान मेट्रोने प्रवास


दैनिक स्थैर्य । दि. ११ डिसेंबर २०२२ । नागपूर । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज येथील फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी या स्थानकांदरम्यान मेट्रोने प्रवास केला. या प्रवासात त्यांनी प्रवाशांशी संवाद साधला.

प्रधानमंत्र्यांसोबत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव व मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित उपस्थित होते.

 

नागपूर शहराला नवी ओळख प्राप्त करून देणाऱ्या मेट्रोवर आधारित प्रदर्शनाची पाहणीही श्री. मोदी यांनी केली. यावेळी मेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित यांनी मेट्रोच्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. या पाहणीनंतर श्री. मोदी यांनी फ्रीडम पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी प्रवास केला. या प्रवासात त्यांनी स्टार्टअप विद्यार्थी, मेट्रो कर्मचारी व इतर प्रवाशांसोबत संवाद साधला.


Back to top button
Don`t copy text!