प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे मुंबईत आगमन


दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२२ । मुंबई ।  भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे आज एक दिवसाच्या मुंबई भेटीसाठी भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने आगमन झाले.

येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, उद्योगमंत्री सुभाष देसाई, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, राजशिष्टाचार राज्यमंत्री आदिती तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, तीनही सेनादलाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल, लोकप्रतिनिधी आदींनी प्रधानमंत्र्यांचे स्वागत केले.


Back to top button
Don`t copy text!