प्राइमाडॉलरने भारतात सप्लाय चैन ट्रेड फायनान्स लाँच केले

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि. ०५: ब्रिटनमध्ये यशस्वी लाँचिंग केल्यानंतर, प्राइमा डॉलर बाजारातील आघाडीचा ‘सप्लाय चैन ट्रेड फायनान्स’ प्लॅटफॉर्म भारतात आणत आहे. आंतरराष्ट्रीय पुरवठादार कशा प्रकारे निधी मिळवतात आणि त्यांना कसा निधी पुरवला जातो, याचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या कॉर्पोरेट्सकरिता सप्लाय चैन ट्रेड फायनान्स हा एक मार्ग आहे. एलसी आणि इतर बँक ट्रेड फायनान्स इन्स्ट्रुमेंटऐवजी, हा प्लॅटफॉर्म तत्काळ बचत करतो, वस्तूंच्या थेट किंमती कमी करतो तसेच भारतातील आंतरराष्ट्रीय स्पर्धा वाढवतो. १०० भारतीय आयातदार वर्षाला ३० अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा जास्त वस्तू आणत असल्याने प्राइमाडॉलर या क्षेत्रासाठीकिमान ५० दशलक्ष अमेरिकन डॉलर बचतीचे लक्ष्य ठेवत आहे.

‘मेक इन इंडिया’ प्रोग्रामशी पूर्णपणे संलग्न असलेला प्राइमा डॉलरचा प्लॅटफॉर्म मटेरियल्सची इनपुट किंमती कमी करण्यात तसेच वस्तूंच्या विक्रीसाठी आवश्यक विकास व निर्मितीविषयक घटकांची पूर्तता स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्ण करण्याकरिता भारतीय कंपन्यांना मदत करते.

सप्लाय चैन ट्रेड फायनान्सद्वारे कोणत्याही अतिरिक्त आयटी प्रकल्पाविना आयातदारांची थेट बचत केली जाते. आंतरराष्ट्रीय पुरवठादारांना कशा प्रकारे निधी पुरवला जातो यावर नियंत्रण ठेवण्यास हा प्लॅटफॉर्म कॉर्पोरेट आयातदारांना मदत करतो. ब्रिटन आणि युरोपियन बाजारात यशस्वी लाँचिंगनंतर, प्राइमाडॉलरने भारतीय नियमांचे पालन, भारतीय बँकांच्या पद्धती, कस्टम, नियमांचे पालन तसेच भारतीय विनिमय नियंत्रण यंत्रणेनुसार, आपला प्लॅटफॉर्म बदलला आहे. आघाडीच्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट लॉ फर्मने या प्रक्रियेला पाठींबा दिला आहे.

प्राइमा डॉलर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती बॅबेल म्हणाल्या, ‘भारतीय बाजारपेठेच्या गरजेनुसार तयार होण्यासाठी आमच्या यशस्वी सप्लाय चैन ट्रेड फायनान्स प्लॅटफॉर्मने खूप मेहनत घेतली आहे. मात्र आता हे काम पूर्ण झाले आहे. भारतीय कॉर्पोरेट लॉ फर्मचा भक्कम पाठींब्यामुळे हे शक्य झाले आहे. तसेच भारतीय कंपन्या, त्यांचे भारतीय कर्ज पुरवठादार या आघाडीच्या ट्रेड फायनान्स टेक्नोलॉजीचा लाभ घेऊ शकतात.’


Back to top button
Don`t copy text!