
दैनिक स्थैर्य । दि. १९ मार्च २०२२ । बारामती । बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातील एकूण १८ विद्यार्थ्यांनी पोलिस उपनिरीक्षक पदासाठी जाहीर झालेल्या यादीत स्थान मिळविले.
राज्य सेवा परीक्षेत यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांनी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात ख-या अर्थाने या महाविद्यालयाचा व संस्थेचा नावलौकिक वाढविलाअसे गौरवोद्गार संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे यांनीया प्रसंगी काढले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा देशाची राज्यघटना देऊन महाविद्यालयाच्या वतीने संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे, सचिव ॲड. नीलिमा गुजर, व श्री किरण गुजर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा केंद्रातून
१) प्राजक्ता घुले,
२) कल्याणी जावळे,
३) प्रतीक्षा वनवे,
४) अश्विनी कदम,
५) दिपाली धालपे,
६) संजय कोकरे,
७) दत्तात्रेय बाराते,
८) शैलेश मोरे,
९) अशोक नरोटे,
१०) निलेश ओमासे,
११) पृथ्वीराज बाराते,
१२) प्रमोद जगताप,
१३) शंकर पाटील,
१४) शुभम शिंदे,
१५) मनोज कदम
१६) दिपक लोकरे,
१७) गौसे आझम,
१८) अनिकेत वाघ
या विद्यार्थ्यांनी गणवत्ता यादीत स्थान पटकावले. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. सुनिल ओगले यांनी लाॅकडाऊन असतानाही विद्यार्थ्यांची संपूर्ण तयारी करून घेतली. त्यामुळेच हे उत्तुंग यश संपादन करता आले. महामारीच्या काळात ग्रंथालयातील वाचनकक्ष, संस्थेचे भव्य असे क्रिडांगण उपलब्ध करून दिले त्याबद्दल सौ सुनेत्रा पवार यांच्या सह संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विशेष धन्यवाद देऊन डॉ. भरत शिंदे यांनी सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली.
तज्ञ व्यक्ती कडून सर्व विद्यार्थ्यांची मैदानी स्पर्धेसाठी व मुलाखतीची उत्तम तयारी करून घेतली. मंगळवेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मा. बापूसाहेब पिंगळे, प्रा. डॉ. विलास बुवा, प्रा. डॉ. संजय खिलारे, प्रा. डॉ. सुनिल ओगले व स्वतः डॉ भरत शिंदे यांनी मुलाखती घेतल्या व त्यांचा आत्मविश्वास वाढविला. मैदानी प्रशिक्षक श्री. विशाल चव्हाण यांनी उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांनी घेतलेल्या नियमित सरावामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना मैदानी स्पर्धेत शंभर पैकी शंभर गुण मिळाले. श्री. विशाल भोसले यांनी लेखी परीक्षेसाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ भरत शिंदे यांच्या मार्गदर्शना खाली स्पर्धा परीक्षा समितीच्या माध्यमातून या महाविद्यालयातून गेल्या ३-४ वर्षात ५० पेक्षा अधिक विद्यार्थी राज्य सेवा परीक्षेत यशस्वी झाले ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे असे प्रतिपादन संस्थेच्या सचिव अँड नीलिमाताई गुजर यांनी केले.
याप्रसंगी उपप्राचार्य प्रा. अंकुश खोत, डॉ लालासाहेब काशीद डॉ शामराव घाडगे, प्रा. निलिमा पेंढारकर, सौ अलका घोडके व स्पर्धा परीक्षा समितीतील प्राध्यापक व स्पर्धा परीक्षा केंद्रातील विद्यार्थी उपस्थित होते. डॉ आनंदा गांगुर्डे यांनी सूत्रसंचालन केले व डॉ संजय खिलारे यांनी आभार मानले.