
स्थैर्य, सातारा, दि. 27 : लॉकडाऊनचे नियम शिथील होताच सलून व्यवसायिकांना दुकाने सूरू करण्याची परवानगी मिळाली आहे. मात्र कोरोनाची धास्ती अद्याप कायम असल्याने यासाठी उपाय योजना करणे व्यवसायिकांना बंधनकारक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सलून व्यवसायिकांनी दरवाढ केली आहे. अशी माहिती स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
निवदेनात म्हटले की, महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार सलून मध्ये येणाऱया ग्राहकांना कोरोनाची बाधा होवू नये. सलूनमध्ये वापरण्यात येणारे साहित्य निर्जुतुकीकरण करून वापरावे लागणार आहे. प्रत्येक ग्राहकांसाठी दरवेळी नवीन साहित्यांचा वापर करावा लागणार आहे. सोशल डिस्टन्स ठेवणे, दुकानात एकापेक्षा जास्त ग्राहकास थांबता येणार नाही. सर्व सुविधा सलून धारकांनी द्यावयाच्या आहेत. दरम्यान, शहरी भागासाठी केस कापणे 120 रूपये, दाढी करणे 60 रूपये, स्पेशल दाढी करणे 70 रूपये अशी दरवाढ केली आहे. तर ग्रामीण भागासाठी केस कापणे 100 रूपये, दाढी करणे 50 रूपये, स्पेशल दाढी करणे 60 रूपये, शहरी व ग्रामीण भागासाठी स्टाईल केस कापणे 150 रूपये अशी दरवाढ केली आहे.