लंपीला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरणच महत्त्वाचे : श्रीमंत संजीवराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २१ सप्टेंबर २०२२ । फलटण । लंपी स्कीन आजाराला न घाबरता आपण सावधानता बाळगून , प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या पाहिजेत यामध्ये प्रामुख्याने लसीकरण करावे. शासकीय व गोविंद डेअरीच्या माध्यमातून लसीकरणाची सोय केली असून पशुपालकांनी त्याचा फायदा घ्यावा. मागीलवर्षी सुद्धा आपण हा आजार सजगतेने मुकाबला करून परतून लावला होता. ज्या अश्यागावामध्ये अश्या केसेस आढळल्या त्या ठिकाणी दुध उत्पादकांनी चांगली काळजी घेतल्याने व पशुसंवर्धन विभाग तसेच गोविंद पशुवैद्यक विभाग यांनी वेळेवर आजार नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत जनजागृती व गरजे प्रमाणे लसीकरण करून अशी गावे आज लंपी मुक्त झालेली आहे, असे मत गोविंद मिल्कचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

मुंजवडी येथे गोविंद डेअरी मार्फत लंपी या आजारावर प्रतिबंध करण्यासाठी करण्यात आलेल्या लसीकरणाच्या कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विश्वास गावडे, सायली दुध संकलन केंद्राचे प्रमुख कमलाकर ठ्न्के, कुंडलिक कदम, सौ.स्वातीताई कुंडलिक कदम, सचिन वाघमोडे, रमेश पवार, डॉ. शांताराम गायकवाड, गणेश चव्हाण, शुभम राजेशिर्के, मिलिंद बोंद्रे तसेच बहुसंख्य दुध उत्पादक उपस्थित होते

त्यामुळे हा आजार काय आहे व त्यावर नियंत्रण कसे मिळवायचे याबाबत माहिती घेऊन कामकाज होणे आवश्यक आहे. फलटण तालुक्यात गत वर्षी सुद्धा काही भागात या आजाराची लागण जनावरांना झाली होती परंतु पशुपालकांनी पशुवैद्यकांनी केलेल्या ऍलोपॅथी उपचारा बरोबरच पारंपारिकरीत्या करण्यात येणाऱ्या घरगुती उपचाराची जोड मिळाल्याने मरतुकीचे प्रमाण अत्यल्प राहिले व आजारावर नियंत्रण सुद्धा लवकर आले, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

लम्पी स्किन आजार हा देवी विषाणू गटातील कॅप्रीपॉक्स या विषाणूमुळे होतो. चावणार्‍या माशा, डास, गोचिड इत्यादींद्वारे हा आजार एका जनावरापासून दुसर्‍या जनावरास होतो. किटकांमार्फत प्रसार होत असल्याने हा आजार उष्ण व दमट वातावरणात जास्त पसरतो. सुरुवातीस जनावरांना दोन ते तीन दिवस बारीक ताप जाणवतो, असेही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, हा विषाणुजन्य आजार असल्याने या आजारावर कोणतेही ठोस उपचार नाही , केवळ लस या आजारावर नियंत्रण आणि प्रतिबंध करू शकते. त्यामुळे लक्षणे आधारित उपचार करून आपणास या या आजारावर नियंत्रण मिळवावे लागते. आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या जनावरास तत्काळ पशुतज्ज्ञाकडून उपचार करून घ्यावेत.जनावरास ज्वरनाशक, सूज कमी करणारे व वेदनाशामक औषध टोचून घ्यावे. जिवाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिजैविकांचा वापर करावा. प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी उपचार करावेत.असा उपचार करण्यासाठी पशुवैद्यक आजारचे गांभीर्य पाहून ऍलोपॅथी , ऍलोपॅथी व आयुर्वेदिक , किंवा आयुर्वेदिक अश्या पद्धतीने उपचार करतात. तसेच आजार सौम्य स्वरूपाचाच असेल तर पशुपालक आपल्या पारंपारिक घरगुती औषधोपचार पद्धतीचा वापर करूनही आजारावर नियंत्रण मिळवू शकतात.

फलटण तालुक्यात गत वर्षी सुद्धा काही भागात या आजाराची लागण जनावरांना झाली होती परंतु पशुपालकांनी पशुवैद्यकांनी केलेल्या ऍलोपॅथी उपचारा बरोबरच पारंपारिकरीत्या करण्यात येणाऱ्या घरगुती उपचाराची जोड मिळाल्याने मरतुकीचे प्रमाण अत्यल्प राहिले व आजारावर नियंत्रण सुद्धा लवकर आले. तसेच या भागातील बऱ्याच पशु पालकांनी काही सौम्य लक्षणे असणाऱ्या जनावरांचा उपचार यशस्वीरीत्या या घरगुती पारंपारिक आयुर्वेदिक उपचार पद्धतीने केलेला आहे, अेसही श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.


Back to top button
Don`t copy text!