पोलीस असल्याची बतावणी करून पांडेच्या वृद्धेला मिशन हॉस्पिटल परिसरात फसवले


दैनिक स्थैर्य । दि.०६ मार्च २०२२ । वाई । वाई येथील मिशन हॉस्पिटलच्या समोर चायनिज गाड्याच्या समोर दि.3 रोजी सकाळी 11 वाजता पोलीस असल्याची बतावणी करून दोन जणांनी पुढे भांडणे चालली आहेत असे सांगून पांडे येथील 74 वर्षाच्या वृद्धेची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. याची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पांडे येथील छबुताई माधवराव जाधव या वाई येथे कामानिमित्त आल्या होत्या. त्या मिशन हॉस्पिटलसमोरील रस्त्यावरून जात असताना चायनिज गाड्याच्या समोर दोन जण 35 ते 40 वयोगटातील आले.त्यांनी पुढे जोरात भांडण सुरू आहेत.तुमच्याकडे असलेले दागिने काढून द्या सुरक्षित ठेवतो असे म्हणून त्यांनी दिलेले दागीने कागदाच्या पुडीत बांधून परत जाधव यांच्याकडे देऊन ते दोघे निघून गेले. जेव्हा जाधव यांनी पुडी उघडली तर पुडीत लोखंडी कडे आणि दगड आढळून आल्याने फसवणूक झाली असल्याचे निदर्शनास येताच त्या भीतीने पोलीस ठाण्यात गेल्या. अज्ञात दोघांवर त्यांनी गुन्हा दाखल केला असून याचा तपास महिला पोलीस हवालदार चव्हाण या करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!