अध्यक्ष, तुम्ही निशब्द केलत राव : अभिजित निंबाळकर

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, फलटण, दि. २४: अध्यक्ष, २४ एप्रिल म्हणजे तुमचा वाढदिवस..! पण, भावपूर्ण श्रद्धांजली, जयंती, पुण्यतिथी हे शब्दच मुळात तुमच्यासाठी टाईप करायच धाडसचं होत नाहीये. तुम्ही मला कायम सपोर्ट करत राहिलात. क्षणाक्षणाला तुमची कमी जाणवते. तुमच्याविषयी भावना व्यक्त करायला शब्द अपुरे पडतात मी निशब्द होऊन जातो.!

एक सर्व सामान्य कुटुंबातील कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला मुलगा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका उपाध्यक्ष, तालुकाध्यक्ष ते राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सातारा जिल्हा कार्याध्यक्ष तसेच श्रीमंत रामराजे प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याची स्थापना करतो. विद्यार्थ्यांचे उत्तम संघटन करून विविध आंदोलन करून, मोर्चे काढून, निवेदने देऊन विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देतो. विविध राजकीय, सामाजिक उपक्रम आयोजित करून प्रबोधन करतो, हे खरंच प्रेरणादायी आहे. ८-९ वर्षाच्या राजकीय कारकीर्दीत आपण खुप मित्र मंडळी कमवले सर्व राजकीय नेत्यांनसोबत उत्तम संबंध तसेच विरोध हा विचारांचा असावा व्यक्तींचा नसावा हे तुमच ब्रीद सार्थ केल.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये काम करत असताना राजकारणात विरोधी कार्यकर्त्यावर जोरदार टीका करायचा पण त्याबरोबर प्रेमाचा चहा देखील घ्यायचा. राजकारण वेगळे व मैत्री वेगळी हे त्यातून दाखवून दिले. तुमच्याकडून तरूण पिढीला प्रेरणादायी घेण्यासारख खुप काही आहे. आज माझी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका अध्यक्ष पदी निवड झाली, परंतु तुमच्या शिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनाचं अपूर्ण आहे. ज्या विद्यार्थी, तरूणांना राजकारणाची आवड होती त्या विद्यार्थ्यांना राजकारणा बरोबर शिक्षण पूर्ण करा, स्वतःच्या व्यवसायात लक्ष द्या हा मोलाचा सल्ला देखील तुम्ही कित्येक जणांना दिला. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व सामान्य कुटुंबातील हा मुलगा विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी पुढाकार घेऊन निस्वार्थपणे प्रयत्नशील राहिला. सन २०१२ मध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण तालुका उपाध्यक्ष त्यानंतर तालुका अध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस सातारा याच्यासह विविध पदे भूषवली व त्या माध्यमातून कामगिरी दाखवलीत आपल्या कामाच्या जोरावर खुप मोठी मोठी पदे मिळवत गेलात.

मुंबई व पुणे स्थित फलटण व सातारा जिल्ह्यातील नागरिकांसाठी श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानची स्थापना करून विद्यार्थी, युवक महिला, नोकरदार वर्ग यांच्या अडीअडचणींचे प्रश्न मार्गी लागावेत त्यांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून हक्काच व्यासपीठ उपलब्ध व्हावे, ही संकल्पना देखील तुमचीचं.! कोणताही कौटुंबिक वारसा नसताना जिल्हा कार्याध्यक्ष आणि श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानची स्थापना हा तुमचा प्रवास थक्क करणारा होता. तुम्ही तालुकाध्यक्ष असतावेळी काहीवर्षापूर्वी शिवाजी विद्यापीठाने निकालात गोलमाल केल्याच तुम्ही उघडं केल होत.परीक्षेला उपस्थितीत राहिलेल्या विद्यार्थ्यांची अनुपस्थिती नोंद विद्यापीठात होती.परंतु श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रश्न तुम्ही उत्कृष्टरित्या सोडविला होता. तसेच जवळपास सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांची नोंदणी देखील तुम्ही पूर्ण केली होती. राजकारणात एकनिष्ठता काय असते याच ज्वलंत उदाहरण म्हणजे सगळे तुमच्याकडे पाहत होते. काही दिवसांत तुमची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकारिणी वरती निवड होणार होती पण त्या अगोदरच काळाने घाला घातला. आणि विचित्र घडलं. निःशब्द.!

असो, बोलण्यासाखे बरेच आहे. सर्वच गोष्टी बोलू किंवा लिहू शकत नाही. आज तुमच्या वाढदिवसाला तुम्ही आमच्यात हे काही अजुनही मनाला पटत नाही. आपल्या मित्रपरिवारातील प्रत्येकाचा वाढदिवस तुम्ही न चुकता साजरा करत होता. ह्या वर्षी पण तुम्ही तुमचा वाढदिवस साजरा करण्याची संधी मात्र मित्रांना दिली नाही.

– अभिजित निंबाळकर
तालुकाध्यक्ष,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस फलटण.


Back to top button
Don`t copy text!