फलटणचा नगराध्यक्ष जनतेच्या मनातील असेल; माजी खासदार रणजितसिंह यांचे सूचक विधान


स्थैर्य, फलटण, दि. ६ ऑक्टोबर : फलटण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण ‘सर्वसाधारण खुले’ जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, “महायुतीचा नगराध्यक्ष हा आमच्या घरातील करण्यासाठी आम्ही इच्छुक नाही, तर जनतेच्या मनातील नगराध्यक्ष करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहे,” असे सूचक विधान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

दैनिक “स्थैर्य”शी काल झालेल्या एका अनौपचारिक चर्चेदरम्यान त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर होण्यापूर्वीच काल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ही प्रतिक्रिया असून, या विधानामुळे महायुतीच्या संभाव्य उमेदवाराबाबतच्या चर्चांना नवे वळण येत आहे.

एकीकडे राजे गटाकडून युवराज श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांचे नाव उमेदवारीसाठी जवळपास निश्चित मानले जात असताना, दुसरीकडे महायुती मात्र ‘जनतेच्या मनातील’ उमेदवार देणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे महायुती कोणाला संधी देणार, याविषयीची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.


Back to top button
Don`t copy text!