खोटं बोलण्यात मुख्याधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक द्यायला हवं; मुख्याधिकारी व तहसीलदार ब्रम्हदेव आहेत काय ?; ॲड. नरसिंह निकम यांचा सवाल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३१ डिसेंबर २०२२ । फलटण । फलटण शहरामध्ये जी अतिक्रमण हटाव मोहीम सुरु करण्यात आलेली आहे. याला कोणतीही परवानगी नाही. गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या शासकीय आदेशानुसार तुम्ही फलटण शहरातील अतिक्रमणे काढत आहेत. यामध्ये कोणालाही कसलाही कल्पना न देता थेट अतिक्रमण काढण्याचे काम नगरपालिकेच्या माध्यमातून सुरु आहे. जर या बाबत मुख्याधिकारी यांना विचारले ते खोटी उत्तरे देत आहेत. फलटण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना खोटं बोलण्यामध्ये राष्ट्रपती पदक द्यायला हवं यासोबतच एका रात्रीत अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली आणि थेट गोरगरीब जनतेला उध्वस्त करणारे मुख्याधिकारी व तहसीलदार हे ब्रम्हदेव आहेत काय ? असा सवाल फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी यावेळी उपस्थित केला.

फलटण येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सर्व व्यापारी वर्ग एकत्रित आले होते. त्यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे, तुकाराम गायकवाड, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष मंगेश दोशी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वसीम मणेर, भाजपाचे जेष्ठ नेते रवींद्र फडतरे यांच्यासह विविध संघटनाचे पदाधिकारी, व्यापारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

अतिक्रमण काढण्याआधी टाऊन प्लॅनिंग कार्यालयाने फलटण शहरातील अतिक्रमण घोषित केले आहे का ? त्याचा नकाशा तयार केलेला आहे का ? मुख्याधिकारी व तहसीलदार हे कोण आहेत कि, ते हे अतिक्रमण आहे ते नाही. याचा सर्व अधिकार टाऊन प्लॅनींग कार्यालयाला आहेत. त्यांनी घोषित केल्यावरच अतिक्रमण आहे सिद्ध होते. याबाबत कोणताही आदेश नसताना फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व तहसीलदार हे अतिक्रमण हटाव मोहीम राबवत आहेत. यामध्ये आगामी काळात जर हि मोहीम थांबवली नाही तर फलटण शहरात रक्ताचे पाट वाहिल्याशिवाय राहणार नाहीत व यासाठी सर्वस्वी जबाबदार हे मुख्याधिकारीची असतील, असा इशारा सुद्धा फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी यावेळी दिला.

फलटण शहरामध्ये जी मोठ्या नेत्यांची अतिक्रमणे आहेत; ती अतिक्रमणे हि मुख्याधिकारी व तहसीलदार यांना दिसत नाहीत. त्यांना फक्त गोरगरीब जनतेचीच अतिक्रमणे दिसत आहेत. जर अतिक्रमणे पाडायची असतील सरसकट सर्वांचीच अतिक्रमणे पाडणे गरजेचे आहे. ते सुद्धा अतिक्रमण धारकांना पूर्व कल्पना देवूनच पुढील कार्यवाही करणे गरजेचे आहे. कोणालाही कसलीही कल्पना न देता हे जे काम मुख्याधिकारी करत आहेत, याचा जाब विचारण्यासाठी सोमवार दि. ०२ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहोत व त्यांनाच या बाबत कोणत्या आदेशाने अतिक्रमणे पाडत आहेत, याची चौकशी करणार आहोत, असेही यावेळी फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी स्पष्ट केले.

सोशल मीडिया साईटवर एक आदेश सोडून जी हि अतिक्रमण हटाव मोहीम मुख्याधिकारी यांनी सुरु केलेली आहे. त्यांनी आधी पूर्व कल्पना देत अतिक्रमणे काढण्याचे कामकाज करणे गरजेचे होते परंतु एका रात्रीत मेसेज व्हायरल करून जी हि मोहीम सुरु केली आहे, ती पूणतः बेकायदेशीर आहे. कोणताही आदेश नसताना मुख्याधिकारी हे अतिक्रमणे काढण्याचे काम करत आहेत. जर हि मोहीम थांबवली नाही तर आगामी काळामध्ये पुढील होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असे मत माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी व्यक्त केले.

नगरपरिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांनी बळजबरी करून सुमारे तीन वर्षांपूर्वी आमचे अतिक्रमण पाडले आहे. मुख्याधिकारी हे फक्त लाचार नगरसेवक व बंगक्यावरील मंडळींनीमुळे अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केलेली आहे. ज्या इमारतीला पुर्णत्वाचा दाखल देण्यात येतो परंतु त्या इमारतीस पार्किंग नसते, असे खोटे दाखले देण्याचे कारण फक्त मुख्याधिकारी व पालिका कर्मचारी आहेत. आगामी काळामध्ये जर मुख्याधिकारी यांनी आपला मनमानी कारभार थांबवला नाही तरी रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असे मत माजी नगरसेवक तुकाराम गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केले.

कोणातीही मोहीम सुरु करण्याआधी दुकानदारकांना पूर्व कल्पना देण्यासाठी नोटीस देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पुढचा मुद्दा की त्यांचं पुनर्वसन करणे गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी सुद्धा नगरपालिकेने केलेल्या नाहीत. तुमच्या दुकानाच्या पायरीला, तुमच्या दुकानाच्या पत्र्याला एक इंचही तुमचं दुकान हल्ले नाही पाहिजे. यासाठी तुम्ही सर्वांनी निकम वकिलांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहणे गरजेचे आहे. तुम्ही ठाम राहिलात तर तुमच्या दुकानाच्या कुठल्याही इंचालाही फरक आम्ही हात लावू देणार नाही, असे मत माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजपा फलटण शहर अध्यक्ष अमोल सस्ते, राजेश हेंद्रे, आझाद समाज पार्टीचे मंगेश आवळे, विद्यार्थी परिषदेचे रोहित राऊत यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!