दैनिक स्थैर्य | दि. १८ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
काळुबाईनगर नवरात्र उत्सव मंडळाचे कार्य पाहून आजही हिंदू संस्कृती जपली जातेय याचा अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार फलटणचे मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी काढले.
काळूबाईनगर नवरात्र उत्सव मंडळाचे हे ४० वे वर्ष असून यंदाही धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केल्याबद्दल मुख्याधिकारी यांनी मंडळाचे कौतुक केले.
मंडळाच्या वतीने काल घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा तसेच विविध गुण दर्शनाच्या पार पडलेल्या कार्यक्रमांचा बक्षीस समारंभ संपन्न झाला. यावेळी गेली ४० वर्षातील नवरात्र उत्सवात झालेला बदल नगरसेवक अशोकराव जाधव यांनी मांडला. महिलांच्या विशेष उपस्थितीचे कौतुक करून यापुढेही कार्यक्रमास अशीच उपस्थिती दाखवून सहकार्य करण्याचे आवाहन नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केले.
या कार्यक्रमास काळुबाईनगरमधील बहुसंख्य महिला, लहान मुले, मुली, आबाल वृद्ध तसेच मंडळाच्या तरुण कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. त्याबद्दल मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे तसेच काळुबाईनगर महिला उत्सव समितीचे आभार मानले.