सातारा जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू; मयत महिलेच्या नातेवाईकांचा गोंधळ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्हा रुग्णालयात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या दालनाबाहेर महिलेच्या नातेवाईकांनी एकच गोंधळ घातला तिच्या उपचारांमध्ये हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत नातेवाईकांनी गोंधळ सुरू केल्याने जिल्हा रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मात्र रुग्णालयाच्या डॉक्टरांनी महिलेच्या प्रकृतीच्या गुंतागुंत निर्माण झाल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे याबाबतची अधिक माहिती अशी मुळाचा ओढा येथील 21 वर्षीय गर्भवती महिला ही उपचारासाठी सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती तिला कोविड असल्याचे डॉक्टरांनी तिच्या नातेवाईकांना सांगितले उपचारादरम्यान तुझी प्रकृती स्थिर होती मात्र शुक्रवारी महिलेची प्रकृती अचानक गंभीर होऊन तिचा मृत्यू झाल्याने एकच गोंधळ उडाला महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाने बेजबाबदार केल्याचा आरोप केला संबंधित डॉक्टरांनी महिलेकडे लक्ष दिले नाही त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप झाल्याने रुग्णालय परिसरात एकच गोंधळाला सुरुवात झाली.

नातेवाईकांनी रुग्णालयाच्या बाहेर आणि जिल्हा चिकित्सक डॉक्टर सुभाष चव्हाण यांच्या दालनासमोर जमा होत जोरदार घोषणा दिल्या संबंधित डॉक्टरांनी ही महिला कोविड बाधित होती त्यामुळे रक्ताच्या गुठळ्या होऊन तिला ऑक्सिजन लेवल कमी झाली होती त्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले मात्र या उत्तराने संबंधित नातेवाईकांचे समाधान मात्र झाले नाही यासंदर्भात संपूर्ण चौकशी करून या संदर्भात अहवाल सादर केला जाईल असे उत्तर डॉक्टर सुभाष चव्हाण यांनी दिले आहे.


Back to top button
Don`t copy text!