दैनिक स्थैर्य । दि. २३ जुलै २०२३ । मुंबई । केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्रालयाच्या वतीने आयोजित आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाच्या समारोप कार्यक्रमासंदर्भात पूर्व तयारी करण्याविषयी केंद्रिय कॅबिनेट सचिव राजीव गोबा यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्य प्रणालीव्दारे सर्व राज्याचे मुख्य सचिव यांची बैठक घेण्यात आली.
यावेळी राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक, कौशल्य विकास विभागाचे अपर मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन गद्रे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृह विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार सिंग, वन विभागाचे प्रधान सचिव वी. वेणुगोपाल रेड्डी, सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक जयश्री भोज आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आजादी का अमृतमहोत्सव या उपक्रमाचा समारोप “मेरी माटी मेरा देश”, मिट्टी को नमन, विरोंका वंदन, ही संकल्पना घेऊन संपूर्ण देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. मार्च २०२१ पासून सूरु झालेला या उपक्रमाचा ऑगस्ट २०२३ अखेर समारोप होणार आहे. या समारोप उपक्रमात विविध विभागांच्या वतीने अनेक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.