दहिवडी माण तालुक्याची खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण व नियोजन सभा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ एप्रिल २०२३ । माण । प्रत्येक कृषी सहाय्यक यांनी गावनिहाय खरीप हंगामाचे सूक्ष्म नियोजन करावे. त्याचबरोबर कृषी निविष्ठा विक्रेत्यांना  खरीप हंगामात कोणत्याही खतांची कमतरता जाणवणार नाही  असे भाग्यश्री पवार -फरांदे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी आश्वासित केले.

दहिवडी माण तालुक्याची खरीप हंगामपूर्व प्रशिक्षण व नियोजन सभा संपन्न झाली त्यावेळी  त्या बोलत होत्या.

            यावेळी सागर डांगे, उपविभागीय  कृषी अधिकारी, फलटण, सुहास रणसिंग, तालुका कृषि अधिकारी, दहिवडी, डी. बी. शिंदे, मंडळ कृषि अधिकारी, मलवडी , जयदीप बनसोडे, मंडळ कृषि अधिकारी, म्हसवड,  अधिक चव्हाण, मंडळ कृषि अधिकारी,मलवडी, सर्व कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक, प्रगतशील शेतकरी, PMFME अंतर्गत लाभार्थी, रिसोर्स फार्मर, कृषि निविष्ठा विक्रेते आदी  उपस्थित होते.

सकाळच्या सत्रामध्ये पुरस्कार प्राप्त शेतकरी व प्रगतिशील शेतकरी यांचा सन्मान करून सभेला सुरवात करण्यात आली. त्यानंतर तालुका कृषि अधिकारी माण यांनी मागील वर्षात विविध योजना आणि विस्तार कामे बाबत साध्य लक्षांक तसेच या खरीप हंगामात करायच्या कामांचे नियोजन व खत व बियाणे पुरवठा आणि नियोजन बाबत माहिती दिली.

शेतकरी प्रतिनिधी मधून विश्वंभर बाबर, पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार प्राप्त शेतकरी यांनी आपले विचार व्यक्त केले.तसेच निविष्ठा विक्रेता प्रतिनिधी मधून श्री. जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

शेवटी श्री डी बी शिंदे, मंडळ कृषि अधिकारी मलवडी यांनी आभार व्यक्त करून प्रशिक्षण व आढावा सभेची सांगता करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!