प्रविण जाधव व त्याच्या कुटूंबाला बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय खाते सर्वतोपरी मदत करेल : नितीन उबाळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जून 2021 । फलटण । ‘‘आँलपिक खेळाडू प्रविण जाधवचे जीवन संघर्षमय असून त्याने खेळासाठी घेतलेले कष्ट व चिकाटी पाहून तो आपल्या देशाचे नाव उज्ज्वल केल्याशिवाय राहणार नाही. प्रविण व त्याच्या कुटुंबाला बहुजन कल्याण विभाग व सामाजिक न्याय खाते सर्वतोपरी मदत करेल’’, असे प्रतिपादन सहायक समाज कल्याण आयुक्त नितीन उबाळे यांनी केले.

आँलंपिकमध्ये धनुर्विद्या क्रीडा प्रकारात सरडे, ता.फलटण येथील प्रविण रमेश जाधव यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्या कुटुंबाची नितीन उबाळे यांनी सदिच्छा भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.

‘‘प्रविण जाधवने बालवयापासूच आपले जीवन खेळासाठी अर्पण केले आहे. अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत त्याच्या आई-वडीलांनी प्रविणला पाठबळ दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी व खेळाडूंना सुविधांचा अभाव असला तरी सरडे गावात अनेक खेळाडू तयार होत आहेत; ही बाब समाधानाची असून प्रविण निश्‍चितच देशासाठी पदक जिंकेल’’, असा विश्‍वास उबाळे यांनी व्यक्त केला.

प्रारंभी प्रविणचे वडील रमेश जाधव व आई संगिता जाधव यांचा यथोचित सत्कार उबाळे यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर सरडे गावातील विविध क्रिडा प्रकारात देशासाठी खेळणार्‍या खेळाडूंशी नितीन उबाळे यांनी संवाद साधला.

याप्रसंगी माजी सरपंच दत्ता भोसले, रामदास शेंडगे, संजय जाधव, आप्पासाहेब वाघमोडे, भालचंद्र जाधव, आण्णा भंडलकर, सर्जेराव बेलदार, ग्रहपाल कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!