
दैनिक स्थैर्य । 4 एप्रिल 2025। फलटण । वाघोशी (ता. फलटण) येथील शेतकरी कुटुंबातील प्रवीण विश्वासराव पवार या 40 वर्षीय शेतकरी मुलाने तब्बल तीन कोटी रुपये व चारचाकी एसयुव्ही हे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जिंकले.
फलटण तालुक्यातील वाघोशी या छोट्याशा गावातील प्रवीण पवार हा सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील युवक लातूरमध्ये खाजगी कंपनीमध्ये कामाला आहे.
बारावी शिक्षण झालेला प्रवीण पवार हा सोमवार दि. 31 मार्च रोजी झालेल्या आयपीएल सामन्यातील मुंबई व कोलकत्ता संघातील लढतीची त्याने मुंबईच्या बाजूने स्वतःची टीम तयार केली होती.
त्यामध्ये त्याचा प्रथम क्रमांक आला. या बदल्यात त्याला तीन कोटी रुपये व चारचाकी एसयुव्ही बक्षीस मिळाले.